संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहोळा प्रतिकात्मक स्वागत व भजन, हरिपाठ संपन्न
फलटण : संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहोळा प्रतिकात्मक स्वागत आणि श्री विठूराया, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रतिमांचे विधीवत पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, त्यानंतर भजनादी कार्यक्रम संपन्न झाले.
माऊली वारकरी संस्था आणि फलटण तालुका वारकरी संघटना, शहर व तालुक्यातील भाविक, वारकरी, नागरिक यांच्या संयुक्त सहभागाने फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघ कार्यालय परिसर, तांबमाळ, फलटण येथे माऊलींच्या वाटेवर या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी, पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, ह.भ.प. नंदकुमार कुमठेकर महाराज, फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाचे चेअरमन धनंजय पवार, फलटण तालुका वारकरी संघटनेचे अध्यक्ष ह.भ.प. छगन महाराज निंबाळकर आदी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
यावेळी ह.भ.प. गणपतराव बाबुराव निकम तथा बबनराव निकम, ह.भ.प. दादासाहेब शेंडे, सचिव ह.भ.प. जाधव महाराज, भाजप अध्यत्मिक आघाडी फलटण तालुकाध्यक्ष अशोकराव जाधव, जे. एल. काटकर, दूध संघाचे व्यवस्थापक नलवडे साहेब, युवा वारकरी संघटनेचे अध्यक्ष ह.भ.प. पवन महाराज सावंत, ह.भ.प. सूरज महाराज पवार व त्यांचे सहकारी माऊली वारकरी संस्थेचे चालक ह.भ.प. पप्पू महाराज आणि तालुक्यातील वारकरी, महिला/पुरुष सेवेकरी यांनी भजन, हरिपाठ वगैरे मध्ये सहभाग घेतला.
डी. एम. घनवट यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.
No comments