सातारा जिल्ह्यात सरासरी 76.2 मि.मी. पाऊस
सातारा, दि.22 (जिमाका): जिल्ह्यात काल दिवसभरापासून आज गुरुवार सकाळी 10 वाजेपर्यंत सरासरी एकूण 76.2 मि.मी.पाऊस पडला असून आतापर्यंत सरासरी 196.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात सकाळी 10 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा- 100.6(192.6) मि. मी., जावळी- 140.2(295) मि.मी., पाटण-132.9 (290.4) मि.मी., कराड-81.4(156.6) मि.मी., कोरेगाव-50.2 (134.9) मि.मी., खटाव-37.3 (83.3) मि.मी., माण- 8.1 (126.4) मि.मी., फलटण- 4.7 (70.1) मि.मी., खंडाळा- 23.7 (68.7) मि.मी., वाई-112.4 (232.8) मि.मी., महाबळेश्वर-198.3 (848.4) मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
No comments