टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला झाली सुरुवात
गंधवार्ता वृत्तसेवा दि. २३ जुलै - टोकियो ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी संध्याकाळी पार पडला. 32 वी ऑलिम्पिक स्पर्धा कोरोनाच्या सावटाखाली होत आहे. सामान्यत: ऑलिम्पिकमध्ये सर्व देशांमधील खेळाडूंचा सलामीचा कार्यक्रम आणि मार्च पास्ट हा मुख्य आकर्षणचा विषय असतो. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे यंदा 1 हजार खेळाडू आणि अधिकारी या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अंदाजानुसार, जगभरातील सुमारे 350 कोटी लोक हा उदघाटन सोहळा पाहत आहे. लोक टीव्ही, स्मार्टफोन, लॅपटॉप सारख्या उपकरणांवर हा कार्यक्रम पाहत असल्याचे समितीने म्हटले आहे.
टोकियो ऑलिम्पिक 2020 च्या स्पर्धेत 11 हजार 238 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. यावेळी ऑलिम्पिमध्ये 33 क्रिडा प्रकारात 339 सुवर्ण आहेत. उद्घाटन समारंभात जपानचा सम्राट नरुहिटोसुद्धा हजर होता. यावेळी शांततेचा नोबेल पुरस्कार जिंकणार्या बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांना विशेष ऑलिम्पिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
No comments