Breaking News

भारतीय खो-खो महासंघाची निवडणूक बिनविरोध : महाराष्ट्रातून संयुक्त सचिवपदी डॉ. चंद्रजीत जाधव, कार्यकारिणी सदस्यपदी गोविंद शर्मा

Unopposed election of Kho-Kho Federation of India: Chandrajit Jadhav from Maharashtra as Joint Secretary, Govind Sharma as Executive Member

     फलटण : भारतीय खो-खो महासंघाची चौ वार्षिक निवडणूक सन २०२१-२२ ते २०२४-२५ या कालावधीसाठी होणार होती, परंतू उमेदवारी अर्ज दाखल  करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत जेवढया जागा तेवढेच अर्ज दाखल झाल्याने सदरची निवडणूक बिनविरोध झाल्याचे घोषीत करण्यात आले.

          महासंघाच्या संयुक्त सचिवपदी शिवछत्रपती क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार विजेते व महाराष्ट्राचे माजी सरचिटणीस डॉ. चंद्रजीत जाधव (उस्मानाबाद) तर कार्यकारिणी सदस्यपदी राष्ट्रीय पुरस्कार छानणी समिती सदस्य व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस गोविंद शर्मा (औरंगाबाद) यांची निवड बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

     या निवडीनंतर महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे आश्रयदाते  अजितदादा पवार, महाराष्ट्र खो-खो संघटनेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अड अरुण देशमुख आदी खो-खो पदाधिकारी, मार्गदर्शक आणि खो-खो प्रेमींनी नवनिर्वाचितांचे अभिनंदन केले आहे.

     या निवडणुकीत मावळत्या कार्यकारिणीने आपले वर्चस्व प्रस्थापित करत ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी शेवटपर्यंत सर्वांशी समन्वय राखून एक नवीन पायंडा पाडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

      या निवडणूकीत खालील उमेदवार बिनविरोध निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी न्या. राजेश टंडन यांनी सांगितले. त्यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी/सदस्यांची यादी जाहीर केली त्यानुसार, अध्यक्ष : सुधांशु मित्तल (दिल्ली), जनरल सेक्रेटरी : महेंद्रसिंह त्यागी (दिल्ली), खजिनदार : सुरेंद्र कुमार भुतियानी (उत्तरांचल), उपाध्यक्ष भंवरसिंह पलाडा (राजस्थान), कमलजीत आरोरा (छत्तीसगड), लोकेश्वरा(कर्नाटक),

एम. सिता रामी रेड्डी (आंध्र प्रदेश), मधुसूदन सिंह (मणिपुर),राणी तिवारी (हरियाणा), सहसचिव : डॉ. चंद्रजीत जाधव (महाराष्ट्र), नेल्सन सॅम्यूयल (तामिळनाडू), संजय यादव (मध्य प्रदेश),

उपकारसिंह विर्क (पंजाब).

कार्यकारिणी सदस्य : गोविंद शर्मा (महाराष्ट्र), मो. आफताब हुसेन (आसाम), ब्रिश भान (हरियाणा), देवी दत्त तन्वर (हिमाचल), जी. राधाकृष्णन नायर (केरळ), गुरचंद सिंह (पंजाब),

हरभूषण गुलाटी (चंदिगड),

एल. आर. वर्मा (हिमाचल),

एम. व्ही. व्ही. एस प्रसाद (आंध्र),

नीरज कुमार (बिहार),

प्रदुमन मिश्रा (ओरिसा), रवींद्रनाथ बारीक (प. बंगाल), रजत शर्मा (उत्तरांचल), संतोष गरुड (गुजरात).

No comments