वीर धरण फुल्ल! विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते जलपूजन संपन्न
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २६ जुलै - धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे नीरा नदीवर असणारे वीर धरण 100 टक्के भरले आहे. काल दि. २५ जुलै रोजी वीर धरणाचे जलपुजन विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
सातारा, पुणे व सोलापुर जिल्ह्यासाठी महत्वाचे असणारे वीर धरण यावर्षी २५ जुलै रोजी शंभर टक्के भरले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर जलपूजन करण्यात येते. वीर धरण जलाशयाचे विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते जलपुजन होऊन, साडी- चोळी, नारळाने ओटी भरण्यात आली. या वेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचे संचालक श्रीमंत सत्यजितराजे संजीवराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
No comments