फलटण तालुक्यात 130 कोरोना बाधित ; सर्वाधिक मुंजवडी 10
फलटण, दि. 20 ऑगस्ट 2021 (गंधवार्ता वृत्तसेवा) - काल दि. 19 ऑगस्ट 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 130 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 16 रुग्ण तर ग्रामीण भागात 114 रुग्ण सापडले आहेत. फलटण तालुक्यात सर्वाधिक मुंजवडी येथे 10 तर त्या खालोखाल मठाचीवाडी येथे 9 रुग्ण सापडले आहेत.
काल दि. 19 ऑगस्ट 2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 130 बाधित आहेत. 130 बाधित चाचण्यांमध्ये 43 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 87 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 16 तर ग्रामीण भागात 114 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात मुंजवडी 10, मठाचीवाडी 9, कुरवली बुद्रुक 8, झिरपवाडी 2, बिबी 4, पिंपरद 1, विडणी 5, तिरकवाडी 1, गिरवी 6, होळ 3, रावडी बुद्रुक 1, राजाळे 1, सांगवी 1, सोनवडी 1, सोनगाव 3, सुरवडी 2, उपळवे 1, वडले 3, मुरूम तालुका बारामती 1, बिजवडी तालुका माण 2, धुळदेव 2, घाडगेवाडी 1, ढवळ 1, ढवळेवाडी 1, बरड 1, काळज 1, कोळकी 1, कुरवली खुर्द 2, माळेवाडी 1, मलवडी 1, निंभोरे 1, निंबळक 2, निरगुडी 3, पाडेगाव 4, फडतरवाडी 1, राजुरी 4, साखरवाडी 1, सासवड 1, सोनवडी 1, सस्तेवाडी 1, जोरगाव (वाखरी) 1, वाठार निंबाळकर 1, वडजल 3, तरडगाव 1, जाधववाडी 4, नाईकबोमवाडी 2, गुणवरे 2, धरमपुरी 3, बारामती 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments