सातारा जिल्हयात पाच टोळयांतील १५ जण तडीपार ; जिल्हा पोलीस प्रमुख बन्सल यांची कारवाई
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.४ ऑगस्ट - सातारा जिल्ह्यातील विविध शहरे व गावांमध्ये विविध गुन्हे करणाऱ्या पाच टोळ्यांमधील 15 जणांच्या विरुद्ध जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बंसल यांनी कारवाई करत हद्दपरीचे आदेश पारीत केले आहेत. यामध्ये फलटण शहरातील 8, उंब्रज पोलीस ठाणे हद्दीतील 3, सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीतील 2, शिरवळ पोलीस ठाणे हद्दीतील 2 जणांचा समावेश आहे. यापुढेही सातारा जिल्हयात अशाच प्रकारे समाजामध्ये दहशत पसरविणाऱ्या गुडांच्या विरुध्द कारवाई करणेत येणार असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख बंसल यांनी जाहीर केले आहे.
सातारा जिल्हयातील फलटण शहर हद्दीत बेकायदा गाई, म्हैस अशा जनावरांची कत्तल करणारे, जनावरांना निर्दयतेने वागविणारे व गोहत्याबंदी असताना सुध्दा गाईंची निर्दयपणे हत्या करणारे, व गोमासांचा बेकायदा वाहतुक करुन विक्री करणारे टोळीचा प्रमुख १) तय्यब आदम कुरेशी, वय-३६ वर्षे (टोळी प्रमुख) २) हुसेन बालाजी कुरेशी, वय ४७ वर्षे (टोळी सदस्य) ३) जमील मेहबुब कुरेशी, वय ४२ वर्षे, (टोळी सदस्य) ४) सद्दाम हसीम कुरेशी, वय २७ वर्षे, (टोळी सदस्य) ५) अरशद जुबेर कुरेशी, वय-२५ वर्षे, ६) अमजद नजीर कुरेशी, वय ४१ वर्षे, (टोळी सदस्य) सर्व रा. कुरेशीनगर, मंगळवारपेठ फलटण, जि. सातारा यांना जिल्हयातुन तडीपार करणे बाबत बी. के. किंद्रे पोलीस निरीक्षक, फलटण शहर पोलीस ठाणे महाराष्ट्र पोलीस अधिनियम ५५ अन्वये प्रस्ताव सादर केला होता. त्यांना हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा श्री अजय कुमार बंसल यांनी दोन वर्षा करीता पुर्ण सातारा जिल्हा व सोलापुर जिल्हयातील माळशिरस तालुका, पुणे जिल्हयातील बारामती, पुरंदर, भोर तालुका हद्दीतुन हद्दपारचा आदेश केला आहे.
फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीत गर्दी मारामारी, बेकायदा शस्त्र बाळगणारे व बेकायदा हातभट्टी दारु निर्मीती करणारे टोळीचा प्रमुख १) सनी माणिक जाधव, वय २६ वर्षे (टोळी प्रमुख) रा.इंदीरानगर झोपडपट्टी मलटण, ता.फलटण, जि. सातारा. २) गणेश महादेवराव तेलखडे, वय - ३७ वर्षे (टोळी सदस्य) रा.मलटण, ता.फलटण, जि. सातारा यांना जिल्हयातुन तडीपार करणे बाबत श्री. बी.के.किंद्रे पोलीस निरीक्षक, फलटण शहर पोलीस ठाणे महाराष्ट्र पोलीस अधिनियम ५५ अन्वये प्रस्ताव सादर केला होता. त्यांना हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा श्री अजय कुमार बंसल यांनी एक वर्षा करीता पुर्ण सातारा जिल्हा व सोलापुर जिल्हयातील माळशिरस तालुका, पुणे जिल्हयातील बारामती, पुरंदर, भोर तालुका हद्दीतुन हद्दपारचा आदेश केला आहे.
उंब्रज पोलीस ठाणे हद्दीत शरिराविरुध्दचे, जबरी चोरीचे व मालमत्तेचे गुन्हे करणा-या टोळीचा प्रमुख १) राकेश/मुना जालींदर घाडगे, वय-३२ वर्षे (टोळी प्रमुख) रा. कदममळा, उंब्रज, ता. कराड, जि. सातारा. २) शंकर/नाना लक्ष्मण शितोळे, वय - २९ वर्षे (टोळी सदस्य) रा. अंधारवाडी, ता. कराड, जि. सातारा. ३) सोन्या/अनिकेत अधिक चव्हाण, वय २० वर्षे, रा. अंधारवाडी, ता. कराड, जि. सातारा यांना जिल्हयातुन हद्दपार करणे बाबत श्री अजय गोरड उंब्रज पोलीस ठाणे यांनी सादर केला होता. त्यांना हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा श्री अजय कुमार बंसल यांनी एक वर्षा करीता पुर्ण सातारा जिल्हा, सांगली जिल्हयातील कडेगांव, वाळवा, शिराळा तालुका हद्दीतुन हद्दपारचा आदेश केला आहे.
सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीत मोटारसायकल चोरीचे मालमत्तेचे गुन्हे करणा-या टोळीचा प्रमुख १) प्रल्हाद परल्या रमेश पवार, वय १९ वर्षे (टोळी प्रमुख) रा. मानस हॉटेल मागे, केसरकरपेठ सातारा. ता. जि. सातारा. २) विकास मुरलीधर मुळे, वय २० वर्षे (टोळी सदस्य) रा. पावर हाऊस झोपडपट्टी मंगळवारपेठ सातारा, ता. जि. सातारा यांना जिल्हयातुन हद्दपार करणे बाबत श्री. ए. आर. मांजरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सातारा शहर पोलीस स्टेशन यांनी सादर केला होता. त्यांना हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा श्री. अजय कुमार बंसल यांनी दोन वर्षा करीता पुर्ण सातारा जिल्हा हद्दीतुन हद्दपारचा आदेश केला आहे.
शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत गर्दीमारामारीचे गुन्हे करणारे व शिरवळ एमआयडीसी हद्दीत उदयोजकांना दशहत निर्माण करणारे टोळीचा प्रमुख १) संजय तुकाराम ढमाळ, यय ५३ वर्षे (टोळी प्रमुख) रा. केसुर्डी, ता. खंडाळा, जि. सातारा. २) योगेश दादासाहेब ढमाळ, वय २८ वर्षे (टोळी सदस्य) रा.केसुर्डी, ता. खंडाळा, जि. सातारा यांना जिल्हयातुन हद्दपार करणे बाबत श्री. यु. आर. हजारे, पोलीस निरीक्षक, शिरवळ पोलीस स्टेशन यांनी सादर केला होता. त्यांना हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा श्री अजय कुमार बंसल यांनी एक वर्षा करीता पुर्ण सातारा जिल्हा व पुणे जिल्हयातील पुरंदर, भोर, तालुका हद्दीतुन हद्दपारचा आदेश केला आहे.
वरील पाच ही टोळीतील १५ इसमांचेवर प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांचे संशयीत हालचालीस प्रतिबंध झालेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांचे फार मोठे आर्थिक व शारिरीक नुकसान झाले आहे. हद्दपार यांना कायदयाचा धाक नसुन ते बेकायदेशिर कारवाया करीत आहेत. त्यांना सुधारणेची संधी देवुनही त्यांचे वर्तनात सुधारणा इ. आली नव्हती. त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. जनतेमधुन त्यांचेवर कडक कारवाई करणे करीता मागणी होत होती. म्हणून त्यांना मा. श्री. अजय कुमार बंसल, प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ अन्वये पाच प्रस्तावातील १५ इसमांचेवर वरील प्रमाणे आदेश केलेले आहेत.
हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्हयाचा पदभार स्विकारलेपासुन त्यांचे समोर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे हद्दपारीचे एकुण २९ प्रस्तावामध्ये ८२ लोकांचेवर हद्दपारी कारवाई करीता प्रस्ताव सादर करणेत आले होते, त्यामधील १५ प्रस्तावामध्ये ५६ उपद्रवी लोकांना सातारा जिल्हा तसेच लगतचे जिल्हयातील तालुक्यांमधुन हद्दपरीचे आदेश केले आहेत. अदयापही १४ प्रस्तावामधील २६ इसमांची चौकशी चालु आहे. यापुढे जिल्हयातील अशाच उपद्रवी व अवैध धंदे करणारे लोकांचेविरुध्द कारवाई करणेत येणार आहे.
तसेच पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल यांनी सातारा जिल्हयाचा पदभार स्विकारलेपासुन महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ अन्वये २५ गुन्हेगारांचेवर हद्दपारीचे प्रस्ताव दाखल केले आहेत. तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५७ प्रमाणे ८ गुन्हेगारांचेवर हद्दपारीचे प्रस्ताव दाखल केले आहेत. तसेच MPDA कायदयाअंतर्गत एकुण ३ प्रस्ताव सादर करुन २ प्रस्तावांमध्ये मंजुरी मिळवुन त्यांना स्थानबध्द केले आहे. तसेच वाढत्या गुन्हेगारांच्या टोळीच्या अनुशंगाने मोक्का कायदयाअंतर्गत ९ गुन्हयातील एकुण ५३ गुन्हेगारांवर कारवाई करणेत आली आहे.
या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाचे वतीने मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. धिरज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, श्री. किशोर धुमाळ, सातारा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. ए. आर. मांजरे, फलटण शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री.बी.के.किंद्रे, शिरवळ पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. यु. आर. हजारे, उंब्रज पोलीस ठाणेचे, श्री. स.पो.नि. अजय गोरड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक, श्री. मधुकर गुरव, पो.ना. प्रमोद सावंत, पो.काँ. केतन शिंदे, म.मो.काँ. अनुराधा सणस, सातारा शहर पोलीस ठाणेचे पोना राजु कांबळे, पोना गणेश ताटे फलटण शहर पोलीस ठाणेचे शरद तांबे, उंब्रज पोलीस ठाणेचे पोहवा संजय देवकुळे, शिरवळ पोलीस ठाणेचे पोना वैभव सुर्यवंशी यांनी योग्य पुरावा सादर केला. या कारवाईचे सर्व स्थरातुन समाधान व्यक्त होत आहे.
No comments