भयंकर ! फलटण तालुक्यात 202 कोरोना बाधित ; सर्वाधिक विडणी 21
फलटण दि. 21 ऑगस्ट 2021 (गंधवार्ता वृत्तसेवा) - काल दि. 20 ऑगस्ट 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 202 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 17 रुग्ण तर ग्रामीण भागात 185 रुग्ण सापडले आहेत. फलटण तालुक्यात सर्वाधिक विडणी येथे 21 रुग्ण तर त्या खालोखाल राजुरी येथे 11 रुग्ण सापडले आहेत.
कोरोना बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आज कोरोना बधितांची संख्या दीडशेचा आकडा पार करत 202 वर पोहोचली आहे. दी. 9 ऑगस्ट पासून रोज कोरोना बधितांची संख्या 100 च्या वर आहे. कोरोना रुग्ण संख्या वाढत असून, ही वाढ भयंकर आहे. यामुळे चिंता वाढली आहे. नागरिकांनी तसेच प्रशासनाने सावधान झाले पाहिजे.
काल दि. 20 ऑगस्ट 2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 202 बाधित आहेत. 202 बाधित चाचण्यांमध्ये 110 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 92 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 17 तर ग्रामीण भागात 185 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात विडणी 21, राजुरी 11, गुणवरे 9, गिरवी 7, तडवळे 7, हिंगणगाव 6, खामगाव 1, खुंटे 1, बरड 2, काळज 5, कोळकी 5, कुरवली बुद्रुक 4, मठाचीवाडी 2, मांडवखडक 2, मांडवखडक 2, माळेवाडी 1, बिबी 1, मिरढे 1, शिंदेवाडी 1, फडतरवाडी 1, सरडे 2, साखरवाडी 2, सोमंथळी 2, सोनगाव 4, सस्तेवाडी 2, सुरवडी 1, दऱ्याचीवाडी 1, वाठार निंबाळकर 1, वडले 1, तावडी 1, नांदल 2, नाईकबोमवाडी 1, आदर्की खुर्द 1, आदर्की बुद्रुक 3, अलगुडेवाडी 1, पांगरी 2, चिंचणी 1, वळवा 1, चोपडज 2, आंधळी 1, धुळदेव 1, घाडगेवाडी 1, ढवळ 5, कांबळेश्वर 1, मुंजवडी 3, मिरगाव 1, शिंदे नगर 1, विठ्ठल वाडी 2, तिरकवाडी 1, निंबळक 3, निंभोरे 1, पाडेगाव 4, फडतरवाडी 3, सांगवी 1, साठे 4, सासवड 2, सालपे 1, डोंबाळवाडी 2, दुधेबावी 1, चौधरवाडी 4, तरडगाव 2, तांबवे 2, जाधववाडी 7, जावली 2, नांदल 2, आंदरुड 1, गोखळी 1, मुरूम 5, बिजवडी 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments