फलटण मधील गोमांस विक्री व वाहतूक करणारे 6 जण तडीपार
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३ ऑगस्ट २०२१ - सातारा जिल्हयातील फलटण शहर हद्दीत बेकायदा गाई, म्हैस अशा जनावरांची कत्तल करणारे, जनावरांना निर्दयतेने वागविणारे व गोहत्याबंदी असताना सुध्दा गाईंची निर्दयपणे हत्या करणारे, व गोमासांचा बेकायदा वाहतुक करुन विक्री करणारे टोळीचा प्रमुख १) तय्यब आदम कुरेशी, वय-३६ वर्षे (टोळी प्रमुख) २) हुसेन बालाजी कुरेशी, वय ४७ वर्षे (टोळी सदस्य) ३) जमील मेहबुब कुरेशी, वय ४२ वर्षे, (टोळी सदस्य) ४) सद्दाम हसीम कुरेशी, वय २७ वर्षे, (टोळी सदस्य) ५) अरशद जुबेर कुरेशी, वय-२५ वर्षे, ६) अमजद नजीर कुरेशी, वय ४१ वर्षे, (टोळी सदस्य) सर्व रा. कुरेशीनगर, मंगळवारपेठ फलटण, जि. सातारा यांना जिल्हयातुन तडीपार करणे बाबत बी. के. किंद्रे पोलीस निरीक्षक, फलटण शहर पोलीस ठाणे महाराष्ट्र पोलीस अधिनियम ५५ अन्वये प्रस्ताव सादर केला होता. त्यांना हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा श्री अजय कुमार बंसल यांनी दोन वर्षा करीता पुर्ण सातारा जिल्हा व सोलापुर जिल्हयातील माळशिरस तालुका, पुणे जिल्हयातील बारामती, पुरंदर, भोर तालुका हद्दीतुन हद्दपारचा आदेश केला आहे.
No comments