फलटण तालुक्यात 63 कोरोना बाधित ; सर्वाधिक शहर 10, गुणवरे 8
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 6 ऑगस्ट 2021 - काल दि. 5 ऑगस्ट 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 63 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 10 रुग्ण तर ग्रामीण भागात 53 रुग्ण सापडले आहेत. फलटण तालुक्यात सर्वाधिक गुणवरे येथे 8 रुग्ण सापडले आहेत.
काल दि. 5 ऑगस्ट 2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 63 बाधित आहेत. 63 बाधित चाचण्यांमध्ये 13 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 50 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 10 तर ग्रामीण भागात 53 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात गुणवरे 8, धुळदेव 1, घाडगेवाडी 1, खामगाव 1, खडकी 1, ठाकुरकी 1, बरड 2, कांबळेश्वर 4, कोळकी 2, मठाचीवाडी 1, झिरपवाडी 2, पिंप्रद 1, शिंदेवाडी 1, विडणी 2, निंबळक 1, गिरवी 3, फडतरवाडी 1, सरडे 1, साखरवाडी 3, वाखरी 1, वडजल 1, जाधववाडी 2, जावली 1, आदर्की बु 1, राजाळे 1, खुंटे 1, वाठार निंबाळकर 2, बारामती ता बारामती 1, टाकेवाडी ता माण 1, होळ ता बारामती 1रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments