फनपचे नगर अभियंता पंढरीनाथ साठे यांच्यावर कारवाई करावी - नगरसेवक अजय माळवे
फलटण दि. २१ ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) - उध्दटपणे गैरवर्तणुक करणार्या फलटण नगरपरिषदेचे नगरअभियंता पंढरीनाथ साठे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक अजय माळवे यांनी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्याकडे अर्जाद्वारे केलेली आहे.
प्रभाग क्रमांक १० मध्ये कैकाडवाडा परिसरात रुपये दहा लाखापर्यंत पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचे ठरले होते. त्या पध्दतीने त्या कामाचे इस्टिमेट करण्यात आले. सदर काम पुर्ण झाले असुन, त्या कामापैकी वीस ब्रास काम शिल्लक आहे. ज्या वेळेला इस्टिमेट करण्यात आले, त्या वेळेस नगरअभियंता पंढरीनाथ साठे यांनी सदर इस्टिमेट दहा लाखापर्यंत असल्याचे सांगितले. परंतु ते आठ लाखाचेच आहे. त्या वेळेसच जर त्यांनी सदर कामाची रक्कम ही आठ लाख होणार आहे. याबाबत कल्पना दिली असती तर सदरचे कामामध्ये माझ्या प्रभागातील इतर ठिकाणी शिल्लक काम करता आले असते. किंवा माझ्या प्रभागातील त्या कामाशेजारीच कामे यादीमध्ये घेतली असती तर त्या ठिकाणची कामे आज रोजी झाले असते.
नगरअभियंता पंढरीनाथ साठे यांनी जास्त इस्टिमेट दाखवुन कमी काम केले, याचा अर्थ असा होतो की, त्यांना सदरच्या कामामध्ये पैसे खायचे होते. वीस ब्रास अजुन काम शिल्लक आहे याची माहिती कंत्राटदार प्रविण भोसले यांनी दिल्याने नगरअभियंता पंढरीनाथ साठे यांना अजुन प्रस्ताव दाखल करुन व 10% वाढीव धरुन माझ्या प्रभागातील उर्वरित तीन बोळांमधील पेव्हिंग ब्लॉकचे काम करण्यास वारंवार सांगुन सुध्दा उद्धटपणे वागुन या कामाची बिले काढली आहेत. साठे यांच्या अश्या वागणुकीमुळे फलटणकर नागरिक विकासकामांपासुन वंचित राहत आहेत. अश्या प्रकारची त्यांनी प्रभाग क्रमांक १० मध्ये आणि फलटण शहरात अनेक प्रकार केले असुन त्यांच्या या कामाची व कामाच्या गुणवत्तेची चौकशी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्याकडे केलेल्या अर्जामध्ये नगरसेवक अजय माळवे यांनी केलेली आहे.
No comments