ड्रॅगनफ्रुट लागवडीसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन
सातारा (जिमाका): ड्रॅगनफ्रुट फळपिकाची लागवड करण्यासाठी लागवड साहित्य, आधार पद्धत, ठिबक संचन, खते व पिके संरक्षण याबाबीकरीता अनुदान देय आहे. याकरीता रक्कम 4 लाख प्रति हे. प्रकल्पमुल्य ग्राह्य धरुन 40 टक्के प्रमाणे रक्कम 1.60 लाख प्रति हे. अनुदान तीन वर्षात 60:20:20 या प्रमाणे देय आहे. दुसऱ्या वर्षी 75 टक्के व तीसऱ्या वर्षी 90 टक्के झाडे जिवंत असणे अनिवार्य आहे. तरी शेतकऱ्यांनी ड्रॅगनफ्रुट लावगडीसाठी महाडीबीटी पोर्टलर वर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहजन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे यांनी केले आहे.
No comments