इराणी कुस्तीपटूला हरवून बजरंग पुनिया सेमी फायनल मध्ये
गंधवार्ता वृत्तसेवा डी. 6 ऑगस्ट 2021 - भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने टोकियो 2020 मध्ये पुरुषांच्या कुस्तीच्या उपांत्यपूर्व फेरीत इराणच्या मोर्टेझा चेका घियासीला २-१ ने चितपट करत उपांत्य फेरी गाठली आहे.
पहिल्या राऊंडमध्ये बजरंगला तांत्रिक आधारे मोर्तेझाकडून एक पेनल्टी गमावून ०-१ ने पिछाडीवर राहावे लागले. त्यामुळे त्याच्यासमोर सामन्यात पुनरामगन करण्याचे आव्हान होते. मात्र, मोर्तेझाने त्याला संधीच दिली नाही आणि पहिला राऊंड आपल्या नावावर केला.
दुसऱ्या राऊंडमध्येही तो बचावात्मक खेळ करत होता, तर इराणच्या मोर्टेझाने सतत आक्रमण करत होता . तरीही बजरंगही त्याला डाव फेकण्याची संधी देत नव्हता. पण पुन्हा पेनल्टी पॉइंट गमावू नये म्हणून 30 सेकंद दिले, तेव्हा बजरंगला आक्रमक व्हावे लागले.
त्याचा परिणाम असा झाला की, इराणी कुस्तीपटू जो त्याचा पाय धरून त्याला अडकवण्याचा प्रयत्न करत होता, त्याच्या पकडीत उलटा अडकला. बजरंगने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला आणि पहिले दोन गुण मिळवले. यानंतर, त्याने मोर्टेझाला मागे टाकून आणि खांद्याला जमिनीवर ठेवून सामना संपवला.
No comments