Breaking News

अभिनंदन! सिंधू

Congratulations! Sindhu

गंधवार्ता SPECIAL -   पी.व्ही. सिंधू  P.V. Sindhu

    बॅटमिंटनपटू पी.व्ही. सिंधू तू टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये देशाला दुसरे पदक जिंकून दिलेस. कांस्य पदकाच्या लढतीत चीनच्या बिंग जिओ हिचा पराभव करून इतिहास रचलास. ऑलिंपिकमध्ये व्यक्तिगत दोन पदकं पटकावणारी सिंधू तू  एकमेव भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहेस. 2016 रिओ ऑलिंपिकमध्ये तू सिल्व्हर मेडल पटकावलं होतं. आणि  यावर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवून कारकीर्दीत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहेस, या अतुलनीय यशाबद्दल तुझे अभिनंदन! 

    सिंधू, चीनच्या ताइ त्झू यिंगने तुझा पराभव केल्यामुळे तुला सुवर्णपदकापासून दूर राहावं लागलं. मात्र, तू चीनच्या बिंग जिआओसोबत दोन हात करत तिच्यावर मात करत  कांस्य पदक मिळवलं आहेस. सलग दोन ऑलम्पिक मध्ये मेडल्स मिळवत तू इतिहास रचून, खेळाडूंपुढे पुढे एक आदर्श निर्माण केला आहेस. अशाच प्रकारची कामगिरी करत देशासाठी ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदक आणावेस.

    टोकियो ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदकाच्या लढतीत पहिल्या गेममध्ये सिंधूने ११-८ अशी आघाडी घेतली होती. पहिल्या गेममध्ये सिंधूने बिंग जिओला संधी दिली नाही आणि आघाडी कायम ठेवली. पहिला गेम २१-१३ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये देखील सिंधूने ११-८ अशी आघाडी घेतली आणि तो गेम देखील २१-१५ असा जिंकून कांस्य पदक जिंकले.

    टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिल्या फेरीत सिंधूने इस्त्रायलच्या पोलिकार्पोवाचा २१-७, २१-१० असा पराभव केला होता. राउंड ३२ मधील लढतीत सिंधूने हाँगकाँगच्या एनवाई चेयुंगवर २१-९, २१-१६ असा विजय मिळवला. तर उप उपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्ट २१-१५, २१-१३ असा पराभव केला. त्यानंतर काल (३० जुलै) झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधूने जगातिक क्रमांक चारच्या जपानच्या अकेन यामागुचीवर २१-१३, २२-२० असा विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. पण उपांत्य फेरीत चायनीज तैपईच्या ताइ त्झू यिंगने तिचा पराभव केला.

- अ‍ॅड. रोहित अहिवळे, फलटण 

No comments