जमीन छोट्या भावाच्या नावाने केल्याने मोठ्या भावाकडून वडील व छोट्या भावास मारहाण
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : आईच्या नावाची जमीन छोट्या भावाच्या नावे केल्याचा राग मनात धरुन वडिल, आई व छोट्या भावास मारहाण केल्या प्रकरणी निरगुडी ता. फलटण येथील बाप लेका विरोधात फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
या बाबत वडील संपत त्र्यंबक सस्ते वय ७८ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीच्या नावे असलेली जमिन त्यांनी लहान मुलगा रणजित याच्या नावाने केली म्हणुन ३० जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारास निरगुडी ता. फलटण येथे त्यांचा मोठा मुलगा संदिप संपत सस्ते याने वडिलांना दमदाटी व शिवीगाळ करीत लोखंडी पाईपने पायावर मारहाण केली. तसेच या वेळी भांडणे सोडविण्यासाठी आलेला लहान भाऊ रणजित यास संदिप सस्ते व त्याचा मुलगा शुभम संदिप सस्ते यांनी पाईपने मारहाण केली व मध्यस्तीसाठी आलेल्या आईस जमिनीवर ढकलून दिले. या प्रकरणी संदिप संपत सस्ते व त्यांचा मुलगा शुभम संदिप सस्ते दोघेही रा. निरगुडी ता. फलटण यांच्या विरुध्द गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार खाडे करीत आहेत.
No comments