हज यात्रेला नेतो म्हणून फसवणूक ; फलटण पोलीस स्टेशनशी संपर्क करा
फलटण दि. २१ ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) - हज यात्रेसाठी नेतो म्हणून, फलटण तालुक्यातील 17 नागरिकांकडून प्रत्येकी 2 लाख 45 हजार रुपये घेऊन, त्यांना हज यात्रेसाठी न नेता त्यांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी फलटण येथील 1 व चिखली पुणे येथील 2 जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता, पैकी फरार असणारा संशयित अस्लम हसन चौगुले हे सध्या पोलीस कोठडी मध्ये आहेत. संशयित आरोपी अस्लम हासन चौगुले व त्याचे साथिदार यांनी कोणाची अशा प्रकारे फसवणुक केली असल्यास फलटण शहर पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी केले आहे.
१) अस्लम हासन चौगुले २) इस्माईल अस्लम चौगुले दोन्ही रा. चौधरीकाटा, आळंदी - देहु रोड, आक्सा एमपायर प्लॉट नंबर १००८ चिखली, पुणे १७ ३) मोहंमदसादीक मेहमुद बागवान पठाणगल्ली, पाचबत्तीचौक फलटण यांनी आपआपसांत संगणमत करुन फलटण येथील एकुण १७ लोकांना सन २०१७-२०१८ मध्ये हज यात्रेसाठी सौदी अरेबीयाला घेऊन जातो असे म्हणुन प्रत्येकी २ लाख ४५ हजार रुपये घेऊन, त्यांना हज यात्रेला घेऊन न जाता त्यांची आर्थीक फसवणुक केलेली होती. त्याप्रमाणे फलटण शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर ६० / २०१९ भादवि. ४२०,३४ प्रमाणे दाखल असुन सदर गुन्हातील आरोपी नामे अस्लम हासन चौगुले हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरारी झाला होता. सदर आरोपीने जिल्हा व सत्र न्यायालय तसेच मुंबई हायकोर्ट येथे क्रमशः अटकपूर्व जामीन होणेकामी अर्ज दाखल केला होता. सदर आरोपीचा दोन्ही ठिकाणी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलेनंतर संशयित आरोपी अस्लम चौगुले हा प्रथमवर्ग न्यायदंडाधीकारी सोो, फलटण न्यायालय येथे स्वतः हजर झाला. त्याची कोर्टाने दिनांक २४/८/२०२१ रोजी पर्यंत पोलीस अभिरक्षा मंजुर केलेली असुन तो सध्या फलटण शहर पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये आहे.
तरी फलटण शहरातील तसेच आजुबाजुच्या गावातील लोकांना आवाहन करण्यात येते की, संशयित आरोपी अस्लम हासन चौगुले व त्याचे साथिदार यांनी कोणाची अशा प्रकारचे फसवणुक केली असल्यास फलटण शहर पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी केले आहे.
No comments