Breaking News

निरा देवघरच्या प्रलंबित कामासाठी केंद्रातून निधी उपलब्ध होणार - खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर ; केंद्रीय जलशक्ती मंत्री शेखावत यांनी दिले आश्वासन

Funds will be available from the Center for the pending work of Nira Devghar

    फलटण ( गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ५ ऑगस्ट - नीरा देवघर प्रकल्पाच्या प्रलंबित कामे पूर्ण होण्यासाठी,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी   चर्चा झाली असून पंतप्रधान याबाबत सकारात्मक आहेत. आज जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याशी चर्चा झाली. यावेळी नीरा देवघर प्रकल्पातील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी लवकरच केंद्रातून निधी उपलब्ध होईल असे वचन जलशक्ती मंत्री शेखावत यांनी दिले असल्याचे  खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर  यांनी सांगितले.

    केंद्रीय जलशक्ती मंत्रालय दिल्ली येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याशी नीरा देवघर लाभक्षेत्रातील प्रलंबित कामाविषयी चर्चा केली. यावेळी 1984 ला मिळालेल्या मंजुरी पासून 2007 साली धरण बांधकाम पूर्ण होऊन लाभक्षेत्रातील प्रलंबित कामे किती अपुर्ण राहिली व ती का अपूर्ण राहिली, तसेच राज्य सरकारने याबाबत केंद्र सरकारकडे सीडब्ल्यूसी ची मान्यता मिळवण्यासाठी कधीही प्रयत्न केला नाही. कारण राष्ट्रवादीच्या नेते मंडळींनी या धरणाचे पाणी दुष्काळी पट्ट्याला न देता स्वतःच्या मतदारसंघाकडे नेता यावे, यासाठी सातत्याने प्रयत्न केला  व हे पाणी लाभक्षेत्रातील गावांना मिळण्याऐवजी बारामतीला कसे नेले गेले व आजपर्यंत पुढील कामे कशी  रखडवली गेली याबाबत सविस्तर चर्चा झाली.

     नीरा देवधर प्रकल्पाची अपूर्ण कामे पूर्ण झाल्यानंतर  फलटण , माळशिरस, सांगोला या तालुक्यांमधील जनतेचा  फायदा होणार असून, यामुळे हाजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे व कायम दुष्काळी असणाऱ्या भागाचा कलंक पुसला जाईल. त्यामुळे याबाबत आपण जातीने लक्ष देऊन यासाठी निधी उपलब्ध करुन दयावा  अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मंत्री शेखावत यांच्याकडे केली.

   या विषयी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी  याबाबत यापूर्वी चर्चा झाली आहे.  पंतप्रधान ही  याबाबत सकारात्मक आहेत त्यामुळे जलसंपदा मंत्री लवकरात लवकर लाभक्षेत्रातील कामे पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे अभिवचन मंत्री शेखावत यांनी दिले असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर  यांनी सांगितले.

No comments