Breaking News

क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त फलटण येथे अभिवादन

Greetings at Phaltan on the occasion of Krantisinha Nana Patil's jayanti

    फलटण  - : स्वातंत्र्यलढ्यासह देशाच्या जडणघडणीतील क्रांतीसिंह नाना पाटील यांचे योगदान प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी असून देशातील तत्कालीन इंग्रज राजवटीत दीड हजार गावात प्रतिसरकार चालविणारे थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या येथील पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.   
    सर्वश्री दशरथ फुले, सहदेव शेंडे, प्रा. शिवलाल गावडे, शरदराव कोल्हे, हणमंतराव शिरनामे, गुलाबराव दडस, संदिप नाळे, बाळासाहेब शिंदे, जॉनी पलंगे, प्रकाश पी. के. (टायरवाले) यांच्या सह फलटणकर उपस्थित होते.
    सुमारे ३०/३५ वर्षांपूर्वी माजी आमदार कॉ. हरिभाऊ निंबाळकर, माजी आमदार डॉ. कृष्णचंद्र भोईटे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकाराने शहरातील मुख्य चौकात क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला असून प्रतिवर्षी त्यांची जयंती दि. ३ ऑगस्ट आणि पुण्यतिथी दि. ६ डिसेंबर रोजी या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालुन फलटणकरांच्या वतीने अभिवादन करण्यात येते.

No comments