Breaking News

फलटण मध्ये दुपारी 4 नंतर दुकान उघडले तर होणार सील

If the shop opens after 4 pm in Phaltan, there will be a seal

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.५ ऑगस्ट - फलटण शहरात पोलीस प्रशासन व नगर परिषद प्रशासन यांच्यामार्फत संयुक्त मोहीम राबवून दुपारी 4.00 नंतर जी दुकाने, आस्थापना, हातगाडे सुरू असतील तर त्यावर कडक कारवाई करून संबंधित दुकान, आस्थापना ७ दिवसांकरिता पुर्णतः सील करण्यात येणार असल्याचे फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड व फलटण शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी कळवले आहे.

    शहरातील तमाम नागरीक, व्यापारी, दुकानदार, हातगाडे धारक यांना कळविण्यात येते की, सद्यस्थिती मध्ये सातारा जिल्हा काेराेना १९ मध्ये तिसऱ्या स्तरामध्ये असलेने जिल्हाधिकारी साे, सातारा यांचे आदेशानुसार फलटण शहरातील सर्व आस्थापना, व्यवहारे हे आठवड्याचे साेमवार ते शुक्रवार पर्यंत दररोज सकाळी ९.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत सुरू ठेवणे, (मेडिकल,व वैद्यकीय सेवा वगळता) बाबत आदेश आहेत. फलटण तालुक्यातील वाढती रुग्णसांख्य विचारात घेता वरिष्ठांच्या निदेशनुसार उद्या पासून पोलीस प्रशासन व नगरपरिषद प्रशासन यांची दु. 4.00 नंतर संयुक्त मोहीम राबवणार आहेत. तरी 4.00 नंतर  काेणाचेही दुकान, आस्थापना, हातगाडे सुरू राहीलेचे दिसून आलेस संबंधित दुकान, आस्थापना ७ दिवसांकरिता पुर्णतः सिल केले जाईल. हातगाडे जप्त केले जातील याची नाेंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे असे नम्र आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड व फलटण शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी केले आहे.

No comments