ऑस्ट्रेलियाला पराभूत करून भारतीय महिला हॉकी संघ उपांत्य फेरीत
विजयानंतर जल्लोष करताना भारतीय महिला हॉकी संघ |
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 2 ऑगस्ट 2021 - टोकियो 2020 च्या उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाला 1-0 ने पराभूत करून भारतीय महिला हॉकी संघ उपांत्य फेरीत पोहचला आहे. ऑलिम्पिक क्रीडा इतिहासात प्रथमच उपांत्य फेरी गाठणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघासमोर पुढील आव्हान अर्जेंटिना संघाचे असेल.
अर्जेंटिनाने रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेता जर्मनीला पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात 3-0 ने पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
भारत आणि अर्जेंटिना दोन्ही संघ सध्या हॉकीची स्वतःची शैली खेळत आहेत. अशा स्थितीत या दोन विरोधी शैलीच्या संघांमधील उपांत्यपूर्व सामना पाहणे खूप मनोरंजक असेल.
भारतीय हॉकी संघाने प्रथमच ऑलिम्पिक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. यापूर्वी भारतीय महिलांनी मॉस्को ऑलिम्पिक 1980 मध्ये चौथ्या क्रमांकावर स्थान मिळवले होते.
No comments