यशराज देसाई यांनी सुरु केलेल्या वरद पेट्रोलियम या पेट्रोल पंपाचा शुभारंभ
दौलतनगर दि.04 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- पुणे ते बेंगलोर या आशियाई महामार्गावरील भरतगाव, ता.जि.सातारा गावाच्या हद्दीमध्ये यशराज देसाई यांनी सुरु केलेल्या वरद पेट्रोलियम या पेट्रोल व डिझेल पंपाचा शुभारंभ घरगुती पध्दतीने संपन्न झाला. यावेळी श्रीमती विजयादेवी देसाई, गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवा नेते यशराज देसाई, सौ.स्मितादेवी देसाई, कु. ईश्वरी देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
भरतगाव, ता.जि.सातारा येथे नव्याने झालेल्या वरद पेट्रोलियम या पेट्रोल व डिझेल पंपामुळे पुणे ते बेंगलोर या आशियाई महामार्गवरुन ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी चांगली सोय झाली असून अत्याधुनिक सुविधा व सुसज्ज यंत्रणेसह उभारण्यात आलेल्या या पेट्रोल पंपाच्या माध्यमातून वाहन धारकांना चांगली सेवा मिळणार आहे.
No comments