गुणवरे येथे विविध विकास कामांचा शुभारंभ ; १५.५० लाख खर्चाच्या कामास सुरुवात
विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी सरपंच सौ. शशीकला गावडे व उपसरपंच प्रा. रमेश आढाव व इतर मान्यवर |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - गुणवरे (ता .फलटण ) येथील ग्रामपंचायती अंतर्गत १४ व्या वित्त आयोगातील सुमारे १५ .५० लाख रूपये खर्चाच्या प्रलंबीत विकास कामांचा शुभारंभ सरपंच उपसरपंच यांच्या हस्ते श्री फळ वाढवुन नुकताच करण्यात आला.
ग्रामपंचायती समोरील बाजारतळाचे ८ लाख ५० हजार रूपये खर्चाचे सिमेंट काँक्रीटीकरण , जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या नजीक ७ लाख रूपये खर्चाची नवीन अंगणवाडी बांधकाम या दोन कामाचा शुभारंभ सरपंच सौ. शशीकला गावडे व उपसरपंच प्रा. रमेश आढाव यांचे हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी जे.पी. गावडे भैरवनाथ सोसायटीचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव लंगुटे , बाळासाहेब गौंड, तुकाराम गावडे , ग्रामसेवक भोसले ग्रामपंचायत सदस्य विलास चव्हाण अजित( बापु) कणसे अंकुश गरगडे , संजय जाधव,शैलेश गावडे, सुनिता घुले, अधिका गावडे, सविता आढाव , मिनाताई कांबळे ,भारती गावडे, यांचे सह ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.
विकास कामांच्या शुभारंभ करताना उपसरपंच प्रा. रमेश आढाव व इतर मान्यवर |
१४ व्या वित आयोगातील प्रलंबीत कामांना सुरूवात झाली असुन मागील चार महिण्यापुर्वी दोन तीन विकास कामे पुर्ण केली आहेत. सध्या दोन कामे सुरू केली आहेत. उर्वरीत कामेही यथावकाश सुरू केली जाणार आहेत. कामांचा दर्जा आणि गुणवत्ता याच्यावर ग्रामपंचायत लक्ष केंद्रित करणार असल्याचे सरपंच व उपसरपंच यांनी यावेळी सांगिले असुन, कोरोना महामारीमुळे विकास कामांत अडथळे निर्माण होत असल्याची खंतही या वेळी त्यांनी व्यक्त केली आहे.
No comments