लव्हलिन बोर्गोहेन ला कांस्यपदक
गंधवार्ता वृत्तसेवा दि. 4 ऑगस्ट 2021 - टोकियो ऑलिम्पिक बॉक्सिंगच्या 69 किलो वजनी गटात भारतीय बॉक्सर लव्हलिन उपांत्य फेरीच्या लढतीत गतविजेता तुर्कीच्या बुसेनाझ सुरमेलीकडून पराभूत झाली आहे. लव्हलिन पराभूत झाली, पण तिने आपल्या खेळाने भारतीय बॉक्सिंगमध्ये नवा इतिहास लिहिला आहे.
लव्हलिन हा सामना जिंकली असती तर ती ऑलिम्पिक बॉक्सिंगच्या अंतिम फेरीत पोहोचणारी भारताची पहिली बॉक्सर बनली असती. ऑलिम्पिक भारतीय बॉक्सर्सच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीची तिने बरोबरी केली आहे. विजेंदर सिंग (2008 मध्ये) आणि एमसी मेरी कॉम (2012 मध्ये) उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास केला आहे.
No comments