Breaking News

फलटण शहरात सर्वाधिक कोरोना रुग्ण संख्या ; खबरदारी घ्यावी - डॉ. शिवाजीराव जगताप

Phaltan city has the highest number of corona patients; Be careful - Dr. Shivajirao Jagtap

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.४ ऑगस्ट -  : कोरोनाचा  वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी एकीकडे वेगवान प्रयत्न सुरु असताना कोरोनाचा  प्रादुर्भाव ग्रामीण भागात वाढतो आहे, शहरात नाही म्हणून दिवसभर फलटण शहरात सर्व रस्ते, चौक, मुख्य बाजार पेठा गर्दीने अक्षरशः फुलुन जात आहेत, परिणामी ग्रामीण भागात नाही शहरातच रुग्ण संख्या अधिक असल्याचे खालील आकडेवारीवरुन स्पष्ट झाले असल्याने सर्वांनी मिळून, शहर व तालुक्याचे आरोग्य जपण्यासाठी योग्य खबरदारी घेऊन संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी ठोस भूमिका घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी केले आहे.

       फलटण शहर व तालुक्यात दि. २३ जुलै ते दि. १ ऑगस्ट या १० दिवसांच्या कालावधीत तालुक्यात १०७८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत, त्यापैकी सर्वाधिक म्हणजे ७७ रुग्ण फलटण शहरातील असल्याचे स्पष्ट झाल्याने आता फलटण करांनी विशेष खबरदारी घेतली पाहिजे अशी अपेक्षा प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी व्यक्त केली आहे.

     सदर आकडेवारी अभ्यासल्यानंतर आता प्रशासनाने फलटण शहरावर अधिक लक्ष केंद्रीत करुन मास्क, सॅनिटायझर वापर न करणारे, विनाकारण गर्दी करणारे किंवा दुचाकी/चारचाकी वाहने घेऊन गर्दी करणारे लोकांवर योग्य निर्बंध लावून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. शहर वासीयांनीही प्रशासन निर्बंधाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यापूर्वी आपली जबाबदारी ओळखून स्वतः सर्व नियम निकषांचे पालन करुन आपले व शहराचे आरोग्य अबाधीत ठेवावे असे आवाहन मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी केले आहे.

     शहर व तालुक्यातील लोकांनीही आपले व आपल्या तालुक्यातील लोकांचे आरोग्य सांभाळणे विशेषतः भविष्यात येऊ घातलेल्या तिसऱ्या लाटेचा विचार करता ती कशी थोपविता येईल यासाठी योग्य खबरदारी घेतली पाहिजे, आपल्या सहकाऱ्यांना त्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.

     दि. २३ जुलै ते दि. १ ऑगस्ट दरम्यान फलटण शहर व ग्रामीण भागात असलेली रुग्ण संख्या खाली दिली आहे, ती शांतपणाने वाचून त्याबाबत अभ्यास केल्यास फलटण शहरातच रुग्ण संख्या अधिक असल्याचे दिसून येईल.

      फलटण शहर व तालुक्यात दि. १ ऑगस्ट रोजी १०७८ कोरोना बाधीत रुग्ण उपचार घेत होते, त्यामध्ये फलटण शहरात सर्वाधिक ७७, कुरवली बु|| ६४, तरडगाव ५९, पाडेगाव ५०, कोळकी ४७, 

सुरवडी ३८, मिरढे ३२, रावडी खु|| २९, विडणी २८, साखरवाडी २२, ठाकुरकी २०, शिंदेवाडी २०, पिंप्रद १९, जाधववाडी १८, मुरुम १८, गुणवरे १७, बरड १६, खडकी १६, ढवळ १५, सोमंथळी १४, गिरवी १४, राजाळे १३, शिंदेमाळ १३, आसू १२, घाडगेवाडी १२, वाखरी १२, आरडगाव ११, निंबळक ११, आळजापूर ११, निरगुडी ११, चौधरवाडी १०, गोखळी १०, चव्हाणवाडी १०, हिंगणगाव १०, खुंटे ९, पवारवाडी ९, तडवळे ९, राजुरी ९, आंदरुड ९, वाठार निंबाळकर ९, मिरगाव ९, सस्तेवाडी ८, सरडे ८, कांबळेश्वर ८, वडले ८, फरांदवाडी ७, जिंती ७, सांगवी ७, कोरेगाव ७, मुंजवडी ७,  आदरकी ७,  वाघोशी ७, सासवड७,  सासकल ७, अलगुडेवाडी ६,  टाकळवाडे ६, होळ ६, डोंबाळवाडी ६, जावली ६,  मठाचीवाडी ६, धुमाळवाडी ६,  नांदल ६, साठे ६, धुळदेव ६, खामगाव ५, कापशी ५,  दुधेबावी ५,  हणमंतवाडी ४, फडतरवाडी ४, चांभारवाडी ४, बिबी ४, घाडगेमळा ४,  वडजल ३, शिंदेनगर ३, जिंती ३, विठ्ठलवाडी ३, नाईकबोंबवाडी ३, कोराळे ३, तावडी ३, खटकेवस्ती २, खराडेवाडी २, काळज २, भिलकटी २, तांबवे २,  सालपे २, तिरकवाडी २, मुळीकवाडी २, झिरपवाडी, सोनगाव, रावडी बु||, मिरेवाडी,  आदरकी खु||, शेरेचीवाडी (हिं), बोडकेवाडी, भाडळी खु||, मांडवखडक, तरडफ, सोनवडी बु|| या गावात प्रत्येकी १ आणि उर्वरित २९ गावात एकही कोरोना बाधीत रुग्ण या कालावधीत आढळला नसल्याचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

No comments