फलटण नगर पालिका कर्मचारी महिलेचा विनयभंग
फलटण, दि.२० ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) - सोमवार पेठ, बारामती पुलावर पीडित महिलेचा हात धरून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी संतोष फरांदे यांच्यावर विनयभंग तसेच ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १४ ऑगस्ट २०२१ रोजी पीडित महिला व तिची चुलती असे नगरपालिका फलटण येथील हजेरी संपल्यानंतर ड्युटीवर दुपारी 3.00 वाजता पायी चालत जात असताना, बारामती पुलावर संतोष फरांदे याने पीडित महिलेस आवाज दिल्याने ती थांबली असता, तिच्या जवळ येवुन, तु मला आवडतेस, मी तुला आवडतो का? असे म्हणून वाईट हेतुने पीडित महिलेचा उजवा हात धरला, व पीडित महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले असल्याची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे.
गुन्ह्याचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे करीत आहेत.
No comments