ज्ञानेश्वर अपार्टमेंटच्या नागरिकांनी राबवलेला वृक्षारोपणाचा उपक्रम कौतुकास्पद - उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे
Plantation by Nandkumar Bhoite at Dnyaneshwar Apartment phaltan
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - ज्ञानेश्वर अपार्टमेंटच्या नागरिकांमार्फत राबवण्यात आलेला वृक्षारोपणाचा उपक्रम हा कौतुकास्पद असून, याठिकाणी लावण्यात आलेल्या झाडांचे संवर्धन हे प्रत्येक कुटुंबाने एक झाड अशाप्रकारे करावे, असे आवाहन करतानाच झाडांना पाणी देण्यासाठी एक पाण्याचे कनेक्शन व पाण्याचा हौद बांधून देण्याचे आश्वासन फलटण नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी दिले.ज्ञानेश्वर अपार्टमेंटच्या नागरिकांनी पुढाकार घेऊन, नगर परिषदेच्या माध्यमातून मुधोजी हायस्कूलच्या पाठीमागे असणार्या मोकळ्या प्लॉटवर, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण केले. याप्रसंगी नंदकुमार भोईटे बोलत होते. वृक्षारोपण कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार शामराव अहिवळे, डॉ. माधव पोळ, डॉ.अलका पोळ, ज्ञानेश्वर आपारमेंटचे चेअरमन कुलदीप पिसाळ, सचिव सेवानिवृत्त अभियंता हनुमंत शिंगटे, प्रदीप रणवरे, पत्रकार ॲड. रोहित अहिवळे, प्रशांत बावळे उपस्थित होते.
वृक्षारोपण केल्यानंतर बोलताना नंदकुमार भोईटे म्हणाले की वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे, ज्ञानेश्वर अपार्टमेंटच्या नागरिकांच्या वतीने करण्यात आलेला वृक्षारोपणाचा कार्यक्रम हा कौतुकास्पद आहे. या ठिकाणी लावण्यात आलेल्या झाडांची व्यवस्थित निगा राखून, ती मोठी करावीत त्यासाठी लागणार्या पाण्याची सोय, मी चार ते पाच दिवसात करून देतो, प्रत्येक झाड एका कुटुंबाने वाटून घ्यावे व त्याची योग्य ती निगा राखावी असे आवाहनही नंदकुमार भोईटे यांनी यावेळी केले.
![]() |
उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांचे स्वागत करताना ज्येष्ठ पत्रकार शामराव अहिवळे शेजारी इतर मान्यवर |
फलटण नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे व ज्ञानेश्वर अपार्टमेंटच्या नागरिकांचे एक वेगळे नाते असून हे नाते जिव्हाळ्याचे आहे. येथील नागरिकांचे प्रश्न, अडचणी सोडविण्यासाठी उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे हे स्वतः जातीने लक्ष देऊन ते प्रश्न, अडचणी सोडवतात. आज या ठिकाणी त्यांच्या शुभहस्ते वृक्षारोपन होत असल्यामुळे ज्ञानेश्वर आपारमेंट येथील नागरिकांसह आम्हाला आनंद होत आहे. आज लावण्यात आलेल्या झाडांचे आम्ही चांगले संवर्धन करू अशी ग्वाही ॲड. रोहित अहिवळे यांनी यावेळी दिली.
ग्लोबल वार्मिंग मुळे पृथ्वीवर येणाऱ्या संकटांमध्ये वाढ झालेली आहे, ही संकटे थांबवण्यासाठी वृक्षारोपण करणे हाच एक उपाय आहे. व्यवसाय - निवारा व इतर अनेक कारणांसाठी झालेल्या जंगल तोडीमुळे, वृक्षांचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. त्याचा परिणाम ग्लोबल वार्मिंग वर झालेला आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने वृक्ष लागवड करावे. त्याचा फायदा सर्वांनाच होणार आहे, एखादे झाड आपण लावले तर ते आपल्या सहित इतरांनाही ऑक्सिजनचा पुरवठा, सावली, फळे,फुले देत असते, आपण आत्ताच कोव्हीड काळात ऑक्सिजनची गरज किती आहे ते पाहिले आणि ही झाडे तर आपल्याला मोफत ऑक्सिजन पुरवठा करत असतात, त्यामुळे सर्वांनी वृक्षारोपण करावे असे प्राची बावळे यांनी सांगितले.
यावेळी कोरोना संसर्गाबाबत नागरिकांनी काय काळजी घ्यावी याची माहिती डॉ. पोळ यांनी दिली तसेच कोव्हीड झाल्यानंतर व पोस्ट कोव्हीड बाबतीत काय काळजी घ्यावी यासाठी मी स्वतः मोफत ऑनलाइन कोर्सेस घेतो, नागरिकांनी मला किंवा आमच्या टीमशी संपर्क साधून याचा फायदा घ्यावा असे आवाहनही यावेळी डॉक्टर पोळ यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस नागरिकांच्या वतीने उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांचे स्वागत ज्येष्ठ पत्रकार शामराव अहिवळे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. कार्यक्रमास श्रीमती पुष्पा म्हेत्रे, नितीन ताराळकर, दीपक डाके, शरद उंडे, मधुकर कुलकर्णी, संतोष भोसले, मिलिंद उंडे, सविता उंडे, जयश्री उंडे, मधुरा उंडे, कल्याणी उंडे, शुभम रणवरे, आदित्य रणवरे, ओंकार पिसाळ, आदित्य पिसाळ, सौ. उज्वला पिसाळ, सौ. शारदा नाळे, सौ.विजया अहिवळे, सौ.आशा रणवरे, सौ.रूपाली क्षीरसागर, सौ. सुचिता बावळे, सुमित रणवरे, ओंकार डाके, सौ. भारती डाके, कु.प्राची बावळे, कु. ऐश्वर्या डाके, स्वप्नील शिंगटे, सौ. शालन शिंगटे, शीतल शिंगटे, सौ. आशा गिरी, शुभांगी शिंगटे, शिवेंद्र चोरमले, केतकी उंडे, रणविर बावळे तसेच ज्ञानेश्वर अपार्टमेंट व परिसरातील पुरुष, महिला, युवक - युवती उपस्थित होते.
No comments