ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव उपक्रमांतर्गत माळेवाडी येथे फळझाडांचे वृक्षारोपण
फलटण: फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित "श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण" येथे बी.एस्सी हॉर्टिकल्चर ४ थ्या वर्षात शिक्षण घेत असलेला उद्यानदूत कु. ओंकार आनंदराव केंजळे याने ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव उपक्रमांतर्गत माळेवाडी ता. फलटण येथे फळझाडांचे वृक्षारोपण करून वृक्षारोपनाचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून दिले.
माळेवाडी ता. फलटण येथील प्राथमिक शाळेच्या पटांगणावर वृक्षारोपण करण्यात आले. श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. जयेश लेंभे, प्रा. अमितकुमार पाटील, प्रा. अमोल रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कु. ओंकार आनंदराव केंजळे याने माळेवाडी ता. फलटण येथील प्राथमिक शाळेच्या पटांगणावर आंबा, पेरू व चिंच यांसह अन्य झाडांचे वृक्षारोपण करून करून ग्रामस्थांना पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण व संगोपन आवश्यक असल्याचे निदर्शनास असल्याचे आणून दिले. कार्यक्रमास माळेवाडी गावचे सरपंच श्री. आनंदराव अडसूळ, जगन्नाथ केंजळे यांच्यासह माळेवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments