प्राचार्य शेठ यांचे स्मारिका पुस्तक प्रेरणादायी - डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर
सातारा - प्राचार्य पुरुषोत्तम शेठ म्हणजे अजब रसायन आहे. आयुष्यभर निस्वार्थी भावनेने विद्यादान करत असंख्य विद्यार्थ्यांना सर्वार्थाने सुजाण बनवणारे शेठ सर वयाच्या ऐंशीव्या वर्षीही तरुणांच्या उत्साहाने समाजजीवनात कार्यरत आहेत. त्यांना प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींची सर्वांग परिपूर्ण आणि रसाळ व्यक्तिचित्रे रेखाटणारे त्यांचे स्मारिका हे पुस्तक सर्वांना प्रेरणादायी ठरणार आहे असे उद्गार ज्येष्ठ संशोधक व साहित्यिक दत्तप्रसाद दाभोळकर यांनी काढले .
स्मारिका पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते अनौपचारिक समारंभात झाले, त्यावेळी ते बोलत होते.
सर्वांनी विशेषतः तरुणाईने हे पुस्तक अवश्य वाचावे व त्यातून प्रेरणा घ्यावी स्मारिका हा हिंदीतील शब्द असला तरी गोड्या पाण्याच्या विहिरी असा त्याचा अर्थ असल्याने हे शीर्षक अचूक आहे असेही दाभोळकर पुढे म्हणाले.
मला आयुष्यात अनेकांनी मार्ग दाखविला काहींनी सहकार्य केले .अनेकांनी माझे विचार व जीवन आपल्या मैत्रिने समृद्ध बनवले अशा पंचावन्न व्यक्तींची ही स्मरणयात्रा आहे. त्यांनी दिलेले विचार हे माझ्या जीवनाला आकार देणारे आहेत. मी अनेक नवीन उपक्रम व कार्य यशस्वी करू शकलो .एखादी विहीर जशी आपल्या मधुर पाण्याने तृशार्थाला तृप्ती देते ,तशाच या व्यक्ती आहेत. त्यांच्याबद्दल आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी कृतज्ञता व्यक्त करावी हाच माझा या लेखनामागील हेतू आहे. वाचकांनाही त्यांचे विचार उद्बोधक ठरतील अशी मला खात्री आहे .अशा शब्दात प्राचार्य पुरुषोत्तम शेठ यांनी आपले मनोगत व्यक्त केले दिलिपराज प्रकाशन चे राजीव बर्वे यांनी अतिशय स्नेहभावाने हा ग्रंथ उत्तम रित्या सिद्ध केल्या बद्दलची कृतज्ञता ही यावेळी पुरुषोत्तम शेठ यांनी व्यक्त केली.
या अनौपचारिक प्रकाशन समारंभास शेठ यांची मोजकी मित्र मंडळी उपस्थित होती.
No comments