Breaking News

पी. व्ही. सिंधूला कांस्य पदक

P. V. Sindhu Won bronze medal

    गंधवार्ता वृत्तसेवा  दि १ ऑगस्ट २०२१ -  भारताची बॅटमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हीने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये महिला एकेरीत कांस्यपदक पटकावले आहे. कांस्य पदकाच्या लढतीत सिंधूने चीनच्या बिंग जिओ हिचा पराभव करून देशाला पदक जिंकून दिले. सिंधूचे हे ऑलिम्पिकमधील दुसरे पदक ठरले. याआधी तिने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते. 

    उपांत्य फेरीतील लढतीत सिंधूचा पराभव झाला होता. त्यामुळे सुवर्णपदकाची संधी हुकली होती. पण आज सिंधूने निराश केले नाही. पहिल्या गेममध्ये सिंधूने ११-८ अशी आघाडी घेतली होती. पहिल्या गेममध्ये सिंधूने बिंग जिओला संधी दिली नाही आणि आघाडी कायम ठेवली. पहिला गेम २१-१३ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये देखील सिंधूने ११-८ अशी आघाडी घेतील आणि गेम देखील २१-१५ असा जिंकून कास्य पदक जिंकले.

    यापदकासह सिंधू दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी पहिली भारतीय शटलर बनली आहे. दोन वैयक्तिक पदके जिंकणारी ती भारतातील पहिली महिला खेळाडू आहे. यापूर्वी त्याने रिओ 2016 मध्ये रौप्य पदक जिंकले होते.

No comments