Breaking News

खा. रणजितदादांची फास्ट ॲक्शन... दादांचे शिष्टमंडळ सरडे गावात

Ranjitdada's fast action ... Dada's delegation in Sarde village

        गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 4 ऑगस्ट 2021  - ऑलिम्पिकवीर श्री. प्रवीण जाधव यांच्या सरडे ता. फलटण येथील कुटुंबियांना नवीन घर बांधण्यासाठी गावातील काही लोकांनी विरोध करीत त्यांना धमकावित असल्याचे समजताच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सुचनेनुसार नगरसेवक अशोकराव जाधव, युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष श्री. बजरंग गावडे, भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष नितीन जगताप, माढा मतदार संघाचे विस्तारक शरद झेंडे, राजेश शिंदे यांनी तत्काळ सरडे येथे जाऊन कुटुंबियांची भेट घेतली व बांधकामाची पाहणी केली. यावेळी प्रवीण जाधवचे वडील व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

    यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फोन वरून प्रवीणच्या वडिलांशी चर्चा केली. यावेळी घराच्या कामा बाबत कोणताही अडथळा येणार नाही असा शब्द दादांनी प्रवीण जाधव यांच्या वडीलांना दिला.  

    प्रवीण हा आज देशाची शान आहे. त्याच्या कुटुंबास येणारी अडचण ती आमची अडचण असेल ही भूमिका ठेऊनच आम्ही मदत करू असे खुद्द खासदार साहेबांनी प्रत्यक्ष दूरध्वनी वर बोलताना प्रवीण च्या वडिलांना सांगितले.

अधिक महितीसाठी क्लिक करा - प्रवीण जाधवच्या घरच्यांना त्रास देणाऱ्यांचा योग्य बंदोबस्त केला जाईल - खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर

No comments