रवीकुमार दहिया ला रौप्यपदक
गंधवार्ता वृत्तसेवा दि. 5 ऑगस्ट 2021 - भारताचा कुस्तीपटू रवीकुमार दहिया याने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये रौप्यपदक जिंकून इतिहास घडवला. ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत रशियाच्या झावूर युगूएवने भारताच्या रवी कुमारचा पराभव केला. पहिल्या फेरीनंतर रवी कुमार ४-२ असा पिछाडीवर होता. झावूरने प्रत्येकी एक असे दोन गुण मिळवले. त्यानंतर रवीने दोन गुण मिळून बरोबरी केली. तर झावूरने पुन्हा दोन गुणांची कमाई केली. त्यानंतर झावूरने आणखी ३ गुण मिळवत आघाडी ७-२ अशी केली. अखेर झावूने रवी कुमारवर ७-४ असा विजय मिळवला.
उपांत्य फेरीत रवी दहिया याने कझाकिस्तानच्या नूरीस्लाम सनायेवचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या अंतिम फेरीत जाणारा रवी हा दुसरा भारतीय होता. याआधी २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये सुशीलकुमारने अंतिम फेरीत धडक मारली होती.
No comments