कोळकी येथे लॅपटॉप व सोन्याच्या दागिन्यांसह इतर वस्तूंची चोरी
फलटण, दि. 20 ऑगस्ट 2021 (गंधवार्ता वृत्तसेवा) - कोळकी ता. फलटण येथील घरात शिरून अज्ञात चोरट्यानी घरातील लॅपटॉप व सोन्याच्या दागिन्यांसह इतर वस्तू चोरी करून नेल्या. या चोरीत सुमारे 45 हजारांचा मुद्देमाल चोरीला आहे.
फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 15 रोजी भाडऴी खुर्द येथे शेताला पाणी देणेसाठी रात्रौ 11.30 वाजता फिर्यादी शुभम कुमार सोनवलकर (वय-26 वर्षे , रा.नरसोबानगर कोऴकी) व त्यांचे वडील कुमार सोनवलकर गडबडीमध्ये नरसोबानगर येथील घराचा दरवाजा नुसता ओढुन घेवुन शेतात गेले होते. दिनांक 16 रोजी रात्री 3.30 वाजण्याच्या सुमारास पुन्हा नरसोबानगर येथे घरी आले असता, त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. आत प्रवेश केला असता, घरातील साहीत्य आस्थाव्यस्थ पडल्याचे दिसल्याने फिर्यादी यांनी घरामध्ये काही चोरीस गेले आहे का याची खात्री केली. तर घरामध्ये असणारा लॅपटॉप व फिर्यादी यांची आजी कुसुम सोनवलकर यांची घरामध्ये कपाटात ठेवलेली सोन्याची बोअरमाऴ, सोन्याची अंगठी , टायटन कंपनीचे घडयाऴ तसेच पैशाचे पाकीट त्यामध्ये आधारकार्ड, पँनकार्ड, ड्रायव्हींग लायसन,आर सी बुक , ए.टी एम कार्ड दोन असे आढळून आले नाही. यानंतर फिर्यादी यांना घरात चोरी झाल्याची बाब निदर्शनास आली. या चोरीत एकुण 43 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरटयाने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या प्रकरणी शुभम कुमार सोनवलकर (वय-26 वर्षे , रा.नरसोबानगर कोऴकी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments