मारामारी व बेकायदा शस्त्र बाळगणारे 2 जण तडीपार
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३ ऑगस्ट २०२१ - फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीत गर्दी मारामारी, बेकायदा शस्त्र बाळगणारे व बेकायदा हातभट्टी दारु निर्मीती करणारे टोळीचा प्रमुख १) सनी माणिक जाधव, वय २६ वर्षे (टोळी प्रमुख) रा.इंदीरानगर झोपडपट्टी मलटण, ता.फलटण, जि. सातारा. २) गणेश महादेवराव तेलखडे, वय - ३७ वर्षे (टोळी सदस्य) रा.मलटण, ता.फलटण, जि. सातारा यांना जिल्हयातुन तडीपार करणे बाबत श्री. बी.के.किंद्रे पोलीस निरीक्षक, फलटण शहर पोलीस ठाणे महाराष्ट्र पोलीस अधिनियम ५५ अन्वये प्रस्ताव सादर केला होता. त्यांना हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा श्री अजय कुमार बंसल यांनी एक वर्षा करीता पुर्ण सातारा जिल्हा व सोलापुर जिल्हयातील माळशिरस तालुका, पुणे जिल्हयातील बारामती, पुरंदर, भोर तालुका हद्दीतुन हद्दपारचा आदेश केला आहे.
No comments