दुचाकीस कारची धडक - निंभोरे येथे झालेल्या अपघातात युवक ठार
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : लोणंद-फलटण रोडवर निभोंरे ता. फलटण गावच्या हद्दीत फलटण कडे येणाऱ्या दुचाकीस कारने पाठीमागून जोरात धडक दिली. झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. आदिनाथ दिलीप लाळगे वय २५ बारस्कर गल्ली, फलटण असे त्याचे नाव आहे. कार चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, गुरुवार ता. ५ ऑगस्ट रोजी आदिनाथ लाळगे हा दुचाकीवरून फलटणकडे येत असताना, दुपारी साडेतीनच्या सुमारास निंभोरे ता. फलटण गावच्या हद्दीत त्याच्या दुचाकीस रेनॉल्ट क्विड कार क्र. एम एच ४५ एडी ०३७६ ने पाठीमागून वेगाने धडक दिली. यामध्ये लाळगे हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी कार चालक संतोष महादेव गोरे वय ४८ रा. कोर्टी ता. पंढरपूर जि. सोलापूर याच्या विरुध्द हयगयीने, अविचाराने व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने गाडी चालवून लाळगे याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. संतोष पांडुरंग लाळगे वय ३२ बारस्कर गल्ली, शुक्रवार पेठ, फलटण यांनी या अपघाताची फिर्याद नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे या करीत आहेत.
No comments