फलटण महावितरणचे कार्यकारी अभियंता वग्यानी यांना लाच घेताना रंगेहात पकडले
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ३ ऑगस्ट २०२१ - 13 लाख रुपयांचे बिल मंजुरीसाठी पुढील कार्यालयास पाठवण्यासाठी 39 हजार रुपये लाच मागणी करून, ती स्वीकारताना म.रा.वि.वि.कंपनी कार्यालय, फलटण येथील कार्यकारी अभियंता मंदार प्रकाश वग्याणी यांना अँटी करप्शन ब्युरो सातारा विभागाने रंगेहात पकडले.
एसीबी कडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी केलेल्या कामाचे 13 लाख रुपयेची बिल मंजुरीसाठी पुढील कार्यालयास पाठवण्यासाठी बिलाचा रकमेच्या 3% रक्कमेची मागणी म.रा.वि.वि.कंपनी कार्यालय, फलटण येथील कार्यकारी अभियंता मंदार प्रकाश वग्याणी यांनी तक्रारदाराकडे केली. सदर घटनेबाबत अँटी करप्शन ब्युरो सातारा विभागास माहिती मिळाल्यानंतर दिनांक 3 ऑगस्ट 2021 रोजी फलटण येथे सापळा लावण्यात आला. कार्यकारी अभियंता मंदार प्रकाश वग्याणी यांनी म.रा.वि.वि.कंपनी कार्यालय, फलटण येथील त्यांच्या कक्षात तक्रारदाराकडून 39 हजार रुपये लाच स्वीकारताना एसीबी पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.
सदारची कारवाई श्री.राजेश बनसोडे,पोलीस अधीक्षक लाप्रवि पुणे, श्री.सुरज गुरव,अपर पोलीस अधीक्षक,लाप्रवि पुणे.श्री.सुहास नाडगौडा, अपर पोलीस अधीक्षक,लाप्रवि पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.अशोक शिर्के पोलीस उपधीक्षक,पो.ना.विनोद राजे, पो.कॉ.संभाजी काटकर, तुषार भोसले ,लाप्रवि सातारा यांनी फलटण येथे सापळा पथकात कामगिरी बजावून कार्यकारी अभियंता यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
No comments