फलटण तालुक्यात 39 कोरोना बाधित ; सर्वाधिक गोखळी 7
फलटण दि. 29 सप्टेंबर 2021 (गंधवार्ता वृत्तसेवा) - काल दि. 28 सप्टेंबर 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 39 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 4 रुग्ण तर ग्रामीण भागात 35 रुग्ण सापडले आहेत. फलटण ग्रामीण भागात सर्वाधिक गोखळी येथे 7 रुग्ण सापडले आहेत.
काल दि. 28 सप्टेंबर 2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 39 बाधित आहेत. 39 बाधित चाचण्यांमध्ये 21 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 18 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 4 तर ग्रामीण भागात 35 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात गोखळी 7, खटकेवस्ती 6, गिरवी 3, साखरवाडी 1, उपळवे 2, वाठार निंबाळकर 1, ताथवडा 1, जाधववाडी 2, नांदल 1, खुंटे 1, बरड 1, कोळकी 1, विडणी 3, तिरकवाडी 1, राजुरी 1, सोमंथळी 1, सुरवडी 1, अलगुडेवाडी 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments