Breaking News

फलटण तालुक्यात 46 कोरोना बाधित ; सर्वाधिक शहरात 7

46 corona affected in Phaltan taluka;  highest in City

    फलटण दि. 14 सप्टेंबर  2021  (गंधवार्ता वृत्तसेवा) - काल  दि. 13 सप्टेंबर 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 46 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 7 रुग्ण तर ग्रामीण भागात 39 रुग्ण सापडले आहेत. फलटण ग्रामीण भागात सर्वाधिक सांगवी येथे 5 रुग्ण  सापडले आहेत.    

    काल  दि. 13 सप्टेंबर  2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 46 बाधित आहेत. 46 बाधित चाचण्यांमध्ये 22 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.  चाचण्या तर  व 24 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे.  यामध्ये फलटण शहर 7 तर ग्रामीण भागात 39 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात धुळदेव 1, ठाकूरकी 1,  बरड 3, मुंजवडी 1, हिंगणगाव 1, निंबळक 1, निरगुडी 4, पवारवाडी 1, फडतरवाडी 1, राजुरी 1, सोमंथळी 1, सुरवडी 1, वाखरी 1, वाठार निंबाळकर 2, आसू 2, शिंदेवाडी 1, विडणी 2, गिरवी 1, होळ 1, फरांदवाडी 1, सांगवी 5, साठे 1, उपळवे 1, दुधेबावी 1, जाधववाडी 1,  टाकळवाडा 1, पाचवड तालुका माण 1 रुग्ण बाधित सापडले आहेत. 

No comments