फलटण तालुक्यात 65 कोरोना बाधित ; सर्वाधिक शहरात 12
फलटण दि. 13 सप्टेंबर 2021 (गंधवार्ता वृत्तसेवा) - काल दि. 12 सप्टेंबर 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 65 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 12 रुग्ण तर ग्रामीण भागात 53 रुग्ण सापडले आहेत. फलटण ग्रामीण भागात सर्वाधिक तरडगाव येथे 4 रुग्ण सापडले आहेत.
काल दि. 12 सप्टेंबर 2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 65 बाधित आहेत. 65 बाधित चाचण्यांमध्ये 46 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 19 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 12 तर ग्रामीण भागात 53 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात तरडगाव 4, रावडी 3, ढवळ 1, बरड 2, कांबळेश्वर 1, कोळकी 2, कुरवली बुद्रुक 1, मठाचीवाडी 2, मुंजवडी 1, बीबी 1, मिरढे 2, हिंगणगाव 3, जिंती 1, निंबळक 1, परहर 1, पाडेगाव 1, पवारवाडी 1, राजुरी 1, सासवड 1, सस्तेवाडी 3, सुरवडी 1, दुधेबावी 1, वाठार निंबाळकर 1, वडले 2, तरडफ 2, नांदल 1, पांगरी तालुका माण 1, ठाकूरकी 1, माळेवाडी 1, शिंदेवाडी 1, भाडळी बुद्रुक 1, फरांदवाडी 1, जाधववाडी 2, आदर्की खुर्द 1, गोखळी 1, कोठारी मुदान तालुका महागाव 1, सांगवी तालुका बारामती 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments