गटई कामागारांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल वाटप करणे या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
सातारा (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहकार्य विभागामार्फत 100 टक्के शासकीय अनुदानावर गटई कामगारांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल पुरविणे योजना ग्रामपंचायत आणि अ,ब, क वर्ग नगरपालिका व छावणी क्षेत्र व महानगरपालिका क्षेत्रात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या योजनेंतर्गत गटई कामगारांना 100 टक्के अनुदानावर मोफत पत्र्याचे स्टॉल व 500 रुपये अनुदान दिले जाते. तरी इच्छुकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्या कार्यालयाशी किंवा कार्यालयाच्या 02162-298106 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
No comments