सरडे येथे बायकोने नवऱ्याला मारला चाकू
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - सरडे ता. फलटण येथे नवरा त्याच्या चुलत्याशी बोलत असल्याच्या कारणावरून, चिडून बायकोने नवऱ्याला जाब विचाराला, व झालेल्या भांडणात नवऱ्याला चाकू मारून जखमी केल्या प्रकरणी बायकोवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण संपत घुटे वय २५ वर्ष रा. सरडे ता. फलटण हे दिनांक 27/9/21 रोजी रात्री 8.00 वाजण्याच्या सुमारास, कल्याण संपत घुटे व त्यांची पत्नी साक्षी असे दारात बसले असताना, त्यांच्या पत्नीने, सकाळी तुम्ही तुमच्या चुलत्या बरोबर का बोलत बसला होता? असे म्हणून कल्याण संपत घुटे याच्याशी भांडण करू लागली, तेव्हा कल्याण घुटे तिला समजावून सांगत असताना, तिने ऐकून न घेता, चिडून जाऊन घरातील कांदा कापायचा चाकू घेऊन, डाव्या हाताच्या दंडावर मारून कल्याण घुटे यास जखमी करून, शिवीगाळ दमदाटी केली असल्याची फिर्याद कल्याण संपत गुटे यांनी दिली आहे, त्या अनुषंगाने फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे पत्नी साक्षी कल्याण घुटे रा. सरडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास पोलीस हवालदार टिळेकर हे करीत आहेत.
No comments