Breaking News

हुश्श सुटलो धावपळीतून ! परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उस्फुर्त भावना

The best performance of social justice in the country! Approval orders issued to students through speedy process,

सामाजिक न्यायाची देशातील सर्वोत्तम कामगिरी ! गतिमान प्रक्रिया राबवून विद्यार्थ्यांना दिले मंजुरी आदेश, समाजातील सर्व  स्तरातून विभागावर अभिनंदनाचा वर्षाव 

    माझे वडील मजुरी करतात, कधी स्वप्नातही विचार केला नव्हता अमेरिकेत शिक्षणासाठी जाईल. ते शक्य झाले आहे समाज कल्याण विभागाच्या शिष्यवृत्ती योजनेमुळे आणि तेही इतक्या लवकर प्रक्रिया होऊन, यावर विश्वासच बसत नाही " ही भावना आहे, लंडन येथील (The University of Edinburgh) मध्ये मॅन्युअल स्कॅवेंजिंग (Manual Scavaenging) याविषयाचे संशोधन करण्यासाठी निवड झालेल्या भंडाऱ्याची शिवानी वालेकर या विद्यार्थीनीची. 

    आजही अमरावतीच्या भीमनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या विकासाचे जिवन म्हणजे म्हणतात ना, 12 विश्व दारिद्रय अशा परिस्थितीत वडलांना चहा टपरी चालवण्यास मदत करुन शिक्षण पुर्ण केले. आणि विशेष म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलेल्या लंडनच्या केंब्रिज विद्यापीठात  मध्ये जगातील शिक्षण पध्दतीवर संशोधन करण्यासाठी निवड झालेल्या अमरावतीच्या विकास तातड या विद्यार्थ्यांची भावना तर नक्कीच डोळयात पाणी आणते. 

    असे एक नाही तर अनेक विषयात प्राविण्य मिळविलेले सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी आपल्या भावना समाज कल्याण आयुक्त, डॉ. प्रशांत नारनवरे यांच्याकडे व्यक्त करत होते. जणू हा काही कौटुंबिक सोहळा असून विद्यार्थी आपली सुखदुःखे एकमेकांशी व शासकीय अधिकारी यांच्याशी अदान प्रधान करत होते, सकाळी 9 वाजता सुरु झालेला हा अनोखा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत चालू होता. निमित्त होते सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजने अंतर्गत सन 2021-22 या वर्षात निवड झालेल्या 75 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली असून त्यांचे मुळ कागदपत्रे तपासणी व त्यांना अंतिम मंजुरी आदेश देण्याबाबत दिनांक 20 ऑगस्ट  रोजी आयोजित शिबीर. 

    महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द घकांतील 75 विद्यार्थ्यांना दरवर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिला जातो. समाज कल्याण विभागाचे मंत्री  धनंजय मुंडे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या योजनांमध्ये अमुलाग्र बदल करण्यात आले आहे. 100 टक्के कोटा पूर्ण होत आहे, व त्यातूनच गेल्या दहा वर्षातील रेकॉर्डब्रेक कामगिरी या वर्षी झाली आहे. तसे बघितले तर देशात परदेश शिष्यवृत्ती योजनेबाबत विभागाची सर्वोत्तम कामगिरी झाली असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण अवघ्या काही दिवसांमध्ये जाहिरात प्रसिध्दी करणे पासून अर्ज स्वीकारणे, तपासणे, त्रुटीच्या अर्जाची पुर्तता करुन घेणे, गृह चौकशी करणे, सर्व कागदपत्रांची पडताळणी करणे, या सर्व बाबी चा विचार करता तसेच कोविडची परिस्थिती विचारत घेता विद्यार्थ्याच्या मागणी नुसार वेळोवेळी देण्यात आलेली मुदतवाढ, राज्यात व देशात कोरोनाचे संकट गंभीर कमी दिवसाच्या कालावधीमध्ये व लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये विभागाने रात्रीचा दिवस करुन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करुन अंतिम मंजुरी आदेश दिले आहे. 

    देशातील विविध राज्यांमध्ये अशा पध्दतीने शिष्यवृत्ती दिली जात असली तरी सर्वांत आधी व तितक्याच वेगाने राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने केलेली कामगिरी ही विद्यार्थ्यांना मोठा दिलासा असुन निश्चितच सुखवाह ठरली आहे. या कामगिरीमुळे विद्यार्थी देखील आश्चर्यचकित झाले आहेत. दरवर्षी असंख्य विद्यार्थी परदेशात जात असले तरी त्यात सर्वसामान्य कुटूंबातील विद्यार्थी प्रथमच शिष्यवृत्ती योजनेमुळे जात असल्याने व इतरही बरीच प्रक्रिया करावी लागत असल्याने ते निश्चित तणावात असतात, त्यामुळेच त्याचा ताण कमी झाल्याने हुश्श सुटलो धावपळीतून ! म्हणून विद्यार्थी निश्चित झाले आहे, व त्याचा परदेशाचा प्रवास सुखकर होणार असल्याने त्यांनी काल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कागदपत्र तपासणी शिबिरात आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. सामाजिक न्याय विभागाचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या गतीशील निर्णयामुळे तसेच विभागाचे अप्पर मुख्य प्रधान सचिव अरविंद कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कल्याण विभागाचे आयुक्त श्री प्रशांत नारनवरे यांनी या यावर्षाची योजना धडाक्यात मार्गी लावली. 

    शासन निर्णय दिनांक 12 ऑगस्ट 2021 नुसार शासनाने 75 विद्यार्थ्यांची परदेश शिष्यवृत्ती योजने अंतर्गत निवड केली आहे. विभागाने यावर्षी व्यापक प्रमाणात प्रचार प्रसिध्दी केल्याने गेल्या दहा वर्षाच्या कालखंडातील सर्वाधिक 300 हुन अधिक अर्ज चालू वर्षी प्राप्त झाले होते व त्यातून प्रचंड स्पर्धा निर्माण झाली. तसेच सध्याचे कोविडचे वातावरण व सर्वसामान्यांना शासकीय कामाचा अनुभव लक्षात घेता ही सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण होईल की नाही याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता, मात्र विद्यार्थ्यांच्या सर्व शंका दूर करुन कमी कालावधीत प्रक्रिया पूर्ण करुन विभागाने सर्व विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.   दिनांक 20 ऑगस्ट 2021 रोजी विद्यार्थ्यां बरोबर आलेल्या पालकांना शिष्यवृत्ती मंजुरीचे अंतिम आदेश हातात मिळाल्याने सुखद धक्का बसला, अनेकांना तर विश्वासच बसत नव्हता तर अनेकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी दिली. हे सर्व शक्य झाले आहे ते विभागाचे मंत्री  धनंजय मुंडे यांच्या कृतिशील निर्णयांमुळे.

    विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या प्रशासकीय गतिमानता व विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांची मेहनत याचा संगम होत हा अनोखा कार्यक्रम काल रोजी पुणे येथील समाज कल्याण विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात संपन्न झाला. विभागाकडे प्राप्त झालेल्या सुमारे तीनशेहून अधिक अर्जदारांना योग्य ते मार्गदर्शन केले त्यांच्याकडून आवश्यक ते कागदपत्रांची पूर्तता करुन घेतली तसेच कोविडच्या पार्श्वभूमीवर काही विद्यार्थ्यांना फॉर्म वेळेत सादर करता आले नाही, त्यांनी मुदतवाढ मिळणे संबंधी मागणी केल्याने तात्काळ मंत्री महोदयांनी त्यात दिलेली मुदतवाढ तसेच विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार ऑनलाईन बरोबरच, ऑफलाईन पोस्टाने देखील अर्ज स्वीकारण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्व कागदपत्रांची तपासणी आयुक्तालयाने अतिशय गतिमान करुन सर्व प्रक्रिया पूर्ण करुन आयुक्तालयाच्या छाननी समितीने प्रस्ताव छाननी करुन शासनास सादर केले होते, तितक्याच गतिमान तिने शासनाकडून 75 विद्यार्थ्यांची निवड शासन निर्णय व्दारे करण्यात आली. एकंदरीत शासनाचे काम चार हात लांब अशी जी म्हण प्रचलित आहे या म्हणीला छेद देण्याचे काम सामाजिक न्याय विभागाने केले असून सामाजिक न्याय विभागाचे शिष्यवृती योजनेबाबत केलेल्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करुन धन्यवाद दिले आहेत. 

       कागदपत्र तपासणी व छाननीकामी समाज कल्याण विभागाचे सहआयुक्त भारत केंद्रे, प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, सहायक आयुक्त विजयकुमार गायकवाड, सहायक आयुक्त विद्यानंद चल्लावार, सहायक आयुक्त संगिता डाखकर, सहायक आयुक्त नितीन उबाळे, सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांच्यासह विभागाच्या शिक्षण शाखेतील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी याकामी परिश्रम घेतले.  

No comments