Breaking News

भाजप व विरोधी नगरसेवकांकडून फलटणमध्ये रस्त्यातील खड्डयांमध्ये वृक्षरोपण

BJP and opposition corporators plant trees in potholes in Phaltan

    फलटण दि. 14 सप्टेंबर  2021  (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. भारतीय जनता पक्ष व नगरपरिषदेतील विरोधी गटाच्या नगरसेवकांनी रस्त्यातील खड्डयांमध्ये वृक्षरोपण करून आंदोलन छेडले आहे.

    दरम्यान फलटण शहरातील मलठण परिसरात असणाऱ्या पालखी मार्गासह शहरातील इतर रस्त्यांची दुरवस्था झाली असून, रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत  तरी गणेशोत्सवापूर्वी रस्त्याचे पॅचवर्क करावे अन्यथा रस्त्यावरील खड्डयांमध्ये वृक्षारोपण करण्यात येईल असा इशारा नगरसेवक अशोक जाधव व सचिन अहिवळे यांनी मुख्याधिकारी यांना दिला होता.

फलटणमध्ये रस्त्यातील खड्डयांमध्ये वृक्षरोपण करताना भाजप व विरोधी नगरसेवक

    मात्र फलटण नगर परिषदेने विरोधी नगरसेवकांच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे  दि. ११ रोजी  भारतीय जनता पक्ष व नगरपरिषदेतील विरोधी गटाच्या नगरसेवकांनी  शहरातील उमाजी नाईक चौक, रविवार पेठ तालीम चौक, क्रांतिसिंह नाना पाटील चौक, पालखी मार्ग मलटण, सोमवार पेठ याठिकाणी असणाऱ्या रस्त्यातील खड्डयांमध्ये वृक्षरोपण केले. यापुढेही जर शहरातील रस्त्यांवरील खड्डे मुजवले गेले नाहीत तर मोठे आंदोलन सुरू करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
यावेळी नगरसेवक अशोकराव जाधव, नगरसेवक सचिन अहिवळे, नगरसेवक अनुप शहा, भाजपा शहर अध्यक्ष अमोल सस्ते, बाळासाहेब कुंभार, युवा मोर्चा उपाध्यक्ष नितीन जगताप, डॉ. सुभाष गुळवे, रियाझभाई इनामदार, महेबूब भाई मेटकरी, राहुल पवार, नितीन वाघ, राहुल शहा, शशिकांत रणवरे, सुरज तांदळे, संजय गायकवाड, उमेश पवार, संजय जाधव, तानाजी कराळे, नीलेश चिंचकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

No comments