फलटण नगर पालिकेच्या विरोधात दि.२८ रोजी भाजपाचा निषेध मोर्चा
![]() |
फलटण नगर परिषद अधिकारी मुश्ताक महात यांच्याकडे निवेदन देताना भाजप शहर अध्यक्ष अमोल सस्ते, नगरसेवक अशोक जाधव, सचिन अहिवळे, भाजपा ओबीसी सेलचे अध्यक्ष राजेश शिंदे |
फलटण दि.२५ सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण नगरपालिकेच्या गलथान कारभाराचा निषेध करण्यासाठी मंगळवार दि. २८ सप्टेंबर २०२१ रोजी. सकाळी १० वाजता फलटण शहर भारतीय जनता पार्टी तर्फे निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.
निषेध मोर्चा बाबत भारतीय जनता पार्टी फलटण शहरच्या वतीने नगरपरिषदेला निवेदन देण्यात आले. याप्रसंगी भाजप शहर अध्यक्ष अमोल सस्ते, नगरसेवक अशोक जाधव, सचिन अहिवळे, भाजपा ओबीसी सेलचे अध्यक्ष राजेश शिंदे उपस्थित होते.
फलटण शहरातील पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छतागृहे, भुयारी गटार योजना, रस्ते व्यवस्थापन, झाडेझुडपे यांची वाढ, डास प्रादुर्भाव, या अनुषंगाने रोगराई साथीच्या रोगांचा फैलाव अशा अनेक प्रश्नांच्या बाबत निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी फलटण शहर च्या वतीने मोर्चा काढून निवेदन देणार आहोत.
मोर्चा गजानन चौक, श्रीराम मंदिर, शिंपी गल्ली, रविवारपेठ, बारामती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भरतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महावीर स्तंभ मार्गे फलटण नगर परिषद या मार्गाने मार्गक्रमण करेल. याप्रसंगी शांतते बाबत व सुव्यवस्थेबाबत तसेच कोविड बाबत शासकीय नियमांचे पालन करून निषेध मोर्चा काढणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
No comments