बरड येथे दोघांना मारहाण ; ६ जणांवर गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२८ सप्टेंबर - तू आमचा भाचा स्वप्निल यास गाडी आडवी का मारली असे विचारल्याच्या कारणावरून, बरड बागेवाडी येथील दोघांना लोखंडी पाइप व काठीने मारहाण केल्याप्रकरणी बरड बागेवाडी येथील ६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २७ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास मौजे बरड ता. फलटण गावचे हद्दीत पेट्रोल पंपाजवळ असणाऱ्या जगदंबा हॉटेल येथील गणेश नलवडे यास, तू आमचा भाचा स्वप्निल यास गाडी आडवी का मारली असे फिर्यादी कांतीलाल माणिक घाडगे व अतुल घाडगे यांनी विचारले असता. त्यावर चिडून जाऊन,1) गणेश विलास नलवडे , 2)राहुल विलास नलवडे , 3)दादा कुंडलिक चव्हाण, 4)प्रसाद दिलीप नलवडे , 5)रमेश भास्कर शिंदे , 6)विलास मारुती नलवडे सर्व राहणार बरड बागेवाडी ता. फलटण यांनी जमाव जमवून, हातात लोखंडी पाइप, लाकडी काठी घेऊन फिर्यादी कांतीलाल घाडगे व त्यांचा भाऊ अतुल घाडगे यास लाकडी काठी व लोखंडी पाईपने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली असल्याची फिर्याद कांतीलाल माणिक घाडगे यांनी दिली आहे.यामध्ये कांतीलाल घाडगे व अतुल घाडगे हे जखमी झाले आहेत.
अधिक तपास पोलीस हवालदार हांगे हे करीत आहेत.
No comments