जावली येथे शेळ्या चारण्यावरून मारहाण ; चौघांवर गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - जावली ता. फलटण येथे दुपारी शेळ्या चारण्यावरून झालेल्या भांडणाच्या कारणावरून, रात्री घरी जाऊन एकास मारहाण केल्याप्रकरणी जावली येथील चौघांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 27/09/2021 रोजी दुपारी 1.00 वाजण्याच्या सुमारास जावली ता.फलटण गावचे हद्दीत, चवरेवस्ती शेजारी असणारे शिवारात सचिन द्वारकानाथ साळुंखे हा त्याच्या शेळ्या शिवाजी साळुंखे यांच्या शेतात चारत असल्याने, शिवाजी साळुंखे यांनी त्यास हटकले, तेथे दोघांची बाचाबाची झाली होती. त्यानंतर दि. 27/9/2021 राेजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास 1) सचिन द्वारकानाथ साळुंखे 2) संदीप द्वारकानाथ साळुंखे 3) सागर द्वारकानाथ साळुंखे 4) पारूबाई द्वारकानाथ साळुंखे सर्व रा. जावली ता. फलटण यांनी, मौजे जावली ता. फलटण जि. सातारा गावचे हद्दीत शिवाजी दत्तात्रय साळुंखे यांच्या घरात जाऊन, तू दुपारी शेळ्यांचे कारणावरून, सचिन बरोबर भांडण का केले? असे म्हणून, चिडून जाऊन, हातातील काठीने व लाथाबुक्क्यांनी शिवाजी दत्तात्रय साळुंखे यास मारहाण करून व शिवीगाळ दमदाटी करून शिवाजी साळुंखे याच्या दोन्ही हाताच्या मनगटाजवळ जखम केली असल्याची फिर्याद शिवाजी दत्तात्रय साळुंखे यांनी दिली आहे.
अधिक तपास पोलीस हवालदार हांगे हे करीत आहे.
No comments