सातारा जिल्ह्यात 185 कोरोनाबाधित; 1 बाधिताचा मृत्यू
840 जणांना दिला आज डिस्चार्ज
सातारा दि. 13 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 185 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 1 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.
जावली 4 (9903), कराड 17 (38472), खंडाळा 7 (13978), खटाव 16 (24914), कोरेगांव 14(21467), माण 18(17320), महाबळेश्वर 2 (4630), पाटण 3 (10118), फलटण 64 (36009), सातारा 27 (50307), वाई 5 (15572) व इतर 8 (1999) असे आज अखेर एकूण 244689 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या माण 1, असे एकूण 1 असून आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 6055 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 840 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
No comments