सदगुरु व पु. ना. गाडगीळ अँड सन्स यांच्यावतीने मोफत पोषक दुधाचे वाटप
पोषक दुधाचे वाटप करताना हणमंतराव मोहिते , दिलीपसिंह भोसले, ॲड. सौ. मधुबाला भोसले, निलेश इथापे, विलासराव नलवडे व इतर |
फलटण (प्रतिनिधी) - येथील श्री सद्गुरू हरीबुवा महाराज शिक्षण संस्था व पु. ना. गाडगीळ अँड सन्स यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक 11 मधील दत्तनगर व परिसरातील नागरिकांना गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मोफत पोषक दुधाचे वाटप करण्यात आले.
पीएमडी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट, बारामतीचे हणमंतराव मोहिते यांच्या शुभहस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. श्री सद्गुरू व महाराजा या उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले अध्यक्षस्थानी होते. गणेश चतुर्थीपासून पुढील दहा दिवस परिसरातील सुमारे तीनशे नागरिकांना मोफत पोषक दुधाचे वाटप करण्यात येणार आहे.
मोफत पोषक दुधाचे वाटप उपक्रमा प्रसंगी बोलताना ॲड. सौ. मधुबाला भोसले |
याप्रसंगी स्वयंसिद्धा महिला उद्योग समूहाच्या अध्यक्षा व फलटण नगर परिषद पाणीपुरवठा समितीच्या सभापती ॲड. सौ. मधुबाला भोसले, पु ना गाडगीळ अँड सन्स शाखा व्यवस्थापक निलेश इथापे, संतकृपा मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट चे विलासराव नलवडे, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, सद्गुरु शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तुषार गांधी, सद्गुरु व महाराजा या उद्योग समूहाचे सीईओ संदीप जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना हणमंतराव मोहिते म्हणाले, लॉकडाउन जरी उठला असला, दैनंदिन व्यवहार जरी सुरळीत चालू असले तरी कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक दृष्ट्या कंबरडे अक्षरशा मोडले असून त्यांना आधाराची अजूनही गरज आहे, गणेश मंडळांनी अशा कुटुंबीयांना आधार देऊन त्यांचे जीवनमान स्थिर करण्याचा प्रयत्न करावा.
दिलीपसिंह भोसले म्हणाले कोरोनाच्या काळात अनेक सामाजिक उपक्रम राबवत असताना येथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूं, अंडी आदींचे वाटप यापूर्वीच करण्यात आले होते .पीएनजी व पीएमडी चे हणमंतराव मोहिते यांच्या कल्पनेतून दूध वाटप करण्याचा उपक्रम याठिकाणी संपन्न होत आहे. गणेशोत्सवाच्या काळात रोज सकाळी मोफत पौष्टिक दुधाचे वाटप करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत ॲड. सौ. मधुबाला भोसले यांनी केले. सौ रुपाली सस्ते यांनी सूत्रसंचालन केले. सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल चे प्राचार्य राजेंद्र रेपाळ यांनी आभार मानले .
कार्यक्रमास सद्गुरू शिक्षण संस्थेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, परिसरातील नागरिक उपस्थित होते. सोशल डिस्टंसिंग चे नियोजन करून कोरोनाच्या नियमावलीनुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
No comments