सहाय्यक अभियंत्याच्या गाडीत जबरदस्तीने बसून, घरी जाण्यास केला विरोध
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१५ सप्टेंबर - महावितरण ने तोडलेले विज कनेक्शन जोडुन द्या, असे म्हणत, फलटण येथील सहाय्यक अभियंता चारचाकी गाडीतुन घरी जात असताना, त्यांच्या गाडीत जबरदस्तीने बसुन, त्यांना घरी जाण्यास प्रतिबंध केल्याप्रकरणी धुळदेव येथील नंदकुमार हरिभाऊ कचरे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ११ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील विज महावितरण कार्यालयात, सहाय्यक अभियंता अनिरुध्द आत्माराम लिंमकर हे शासकीय काम करीत असताना, नंदकुमार हरिभाऊ कंचरे रा.धुळदेव ता. फलटण जि. सातारा याने कार्यालयात येवुन, माझ्या हॉटेलचे विज कनेक्शन जोडुन द्या,असे सांगितले. त्यावेळी अनिरुध्द आत्माराम लिंमकर यांनी, तुम्ही बिल भरा तुमचे कनेक्शन जोडुन देतो, असे सांगितले परंतु कचरे यांनी, तुम्ही पहिले विज कनेक्शन जोडुन द्या, तरच मी बिल भरतो असे सांगितले. अनिरुध्द आत्माराम लिंमकर हे लोकसेवक आहेत, हे माहित असताना, सार्वजनिक कार्य पार पाडत असताना, अटकाव करून, अनिरुध्द आत्माराम लिंमकर हे ऑफीस बंद करून, लक्ष्मीनगर येथील ऑफीस समोरील चारचाकी गाडीतुन घरी जात असताना, त्यांच्या गाडीत जबरदस्तीने बसुन, त्यांना घरी जाण्यास प्रतिबंध केला असल्याची फिर्याद अनिरुध्द आत्माराम लिंमकर यांनी दिली आहे.
अधिक तपास पोलीस हवालदार विरकर हे करीत आहेत.
No comments