Breaking News

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून पहाणी

Guardian Minister Balasaheb Patil inspects the premises of Government Medical College

    सातारा (जिमाका):  महाराष्ट्र शासनाने सातारा येथे मंजूर केलेल्या  जागेची पहाणी आज सहकार व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली.

     यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सं.गो. मुंगीलवार आदी उपस्थित होते.

    पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या जागेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभे राहणार आहे. सध्या शासकीय महाविद्यालय खासगी महाविद्यालयांमध्ये सुरु करण्यात आले आहे. पहिल्या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याचा मानस असून शासकीय महाविद्यालयाची इमारत काम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी महाविद्यालय स्थलांतरीत करण्यात येईल.

No comments