रासायनिक खतांचा परिणाम व सेंद्रीय शेती बद्दल कृषिदूताकडून मार्गदर्शन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१६ सप्टेंबर - महात्मा फुले कृषिविद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय पुणे येथील ऋषीकेश शिवाजी होळकर यांनी, ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम २०२१-२०२२ च्या अभ्यास दौऱ्या दरम्यान सोमंथळी ता. फलटण जिल्हा सातारा येथे रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर व त्याचे शेतजमीन व एकूण उत्पादन क्षमतेवर होणारे अनिष्ठ परिणाम यासंबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खतांचा वापर करून सेंद्रिय (ऑर्गनिक) शेती व आर्थिक सुब्बता याची ओळख व त्या अंतर्गत् घेतली जाऊ शकणारी पिके यांची माहिती दिली. तसेंच जमिनीची सुपिकता वाढून ,शाश्वत शेती उत्पन्न वाढ व आर्थिक प्रगती याची महती सोमंथळी येथील शेतकऱ्यांना समजावून सांगितली. आधुनिक पध्दतीने सेंद्रिय खते तयार करण्यासाठीच्या विविध पद्धतींची माहिती सांगितली.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय पुणे मधील सहयोगी अधिष्ठता डॉ. एस.डी मासाळकर सर, प्रा.डॉ. एच.पी. सोनावणे सर,केंद्रप्रमुख डॉ. यु. डी.जगदाळे सर आणी कार्यक्रम अधिकारी डॉ. एम.व्ही. आजोतीकर सर यांच्या मार्गदर्शन खाली हा उपक्रम राबवण्यात आला.
No comments